Asia Cup: भारतासमोर पाकिस्तान पुन्हा गुडघ्यावर! BCCI ठरवणार भवितव्य, आज होणार मोठा निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan Asia Cup 2023

Asia Cup: भारतासमोर पाकिस्तान पुन्हा गुडघ्यावर! BCCI ठरवणार भवितव्य, आज होणार मोठा निर्णय?

India vs Pakistan Asia Cup 2023: आशियाई क्रिकेट परिषदेची आज एक महत्त्वाची तातडीची बैठक पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कप 2023 संदर्भात होणार आहे. खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही बैठक बोलावली आहे. ही बैठक बहरीनमध्ये होणार असून त्यात एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचाही सहभाग असणार आहे.

आशिया कप या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर जय शाह यांची ही भूमिका अजूनही कायम आहे. अशा स्थितीत पाकिस्तानसमोर आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद हिसकावून घेण्याचा धोका आहे. पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत सुरू असलेल्या गोंधळाबाबत ही बैठक बोलावली आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर आशिया चषक पाकिस्तानात होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते. असे झाल्यास आशिया चषक यूएईमध्ये हलविला जाऊ शकतो. श्रीलंका हा दुसरा पर्याय आहे. दोन्ही स्थितीत पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद राखणार आहे.

भारतीय बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, 'जय शाह आधीच एसीसी बैठकीसाठी बहरीनमध्ये उपस्थित आहेत. बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर अजिबात जाणार नाही, कारण यासाठी आम्हाला अद्याप सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. अलीकडे, जय शाह ACC अध्यक्ष म्हणून, पुढील दोन वर्षांसाठी (2023-24) आशियाई क्रिकेटचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये आशिया कपचा देखील समावेश होता. यादरम्यान आशिया कपच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर करण्यात आली नाहीत.