
World Cup 2023 India Vs Pakistan : पाकनं ICC ला सांगून टाकलं! वर्ल्डकप खेळण्यासाठी गप - गुमान भारतात येणार
World Cup 2023 India Vs Pakistan : आशिया कपवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भारताने पाकिस्तानात खेळण्यास साफ नकार दिल्याने आशिया कप त्रयस्थ ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर पाकिस्तानने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. मात्र आता नव्याने पुढे आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची ही धमकी नुसती पोकळ धमकीच निघाली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला सांगितलं आहे की ते पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात होाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 साठी भारतात पाठवणार आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनीच पीसीबीचा निर्णय शंभर टक्के खरा आहे असे सांगितले.
बीसीसीआयची विशेष सर्वसाधार सभा 27 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या बैठकीत आयसीसी वनडे वर्लडकपमधील भारत - पाकिस्तान सामना आणि आशिया कप 2023 या विषयांवर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक आयपीएल फालनलपूर्वी एक दिवस आधी होणार आहे.
भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा वर्ल्डकप 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल. वर्ल्डकप सामन्यांसाठी बीसीसीआयने 12 ठिकाणे निवडली आहेत. अहदमाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पीसीबी चेअरमन नजम सेठी यांनी या ठिकाणी सामना खेळण्यास विरोध केला होता. बीसीसीआयला भारत - पाकिस्तान सामना हा एक लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवायचा आहे. याबाबत बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.