World Cup 2019 : सर्फराजला हटविण्यासाठी टीम झाली अॅक्टिव्ह

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

पाकिस्तानमधील समा वृत्त वाहिनीने दिलेल्या अहवालानुसार भारताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये आल्यावर आदळआपट करत संघातील इमाद वसिम आणि इमाम उल हक यांना त्याला हटविण्यासाठी कारस्थानं करण्यावरुन शिविगाळ केल्याचे समजते.  

वर्ल्ड कप 2019 : लंडन :  भारताविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातील अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या नेतृत्वावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. अशातच पाकिस्तानच्या संघाने आता सर्फराजला हटविण्यासाठी दोन गटांमध्ये काम सुरु केले आहे. 

पाकिस्तानमधील समा वृत्त वाहिनीने दिलेल्या अहवालानुसार भारताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर त्याने ड्रेसिंगरुममध्ये आल्यावर आदळआपट करत संघातील इमाद वसिम आणि इमाम उल हक यांना त्याला हटविण्यासाठी कारस्थानं करण्यावरुन शिविगाळ केल्याचे समजते.  

तसेच दुनिया या वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार पाकच्या संघात महंमद आमीर आणि इमाद यांच्या नेतृत्वाखाली दोन गट तयार केले गेले असून हे दोन्ही गट सर्फराजविरुद्ध काम करत असल्याचे समजत आहे. 

मात्र, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे संघातील एका खेळाडूने सांगितले. तो म्हणाला ''त्याने चिडचिड केली मात्र, ती वैतागल्यामुळे होती. त्याने कोणत्याही खेळाडूला शिवीगाळ केली नाही. त्याने केवळ खेळाडूंना आणखी चांगले खेळायला हवे असे सांगितले.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Divided Into Groups Led By Imad Wasim And Mohammad Amir