esakal | World Cup 2019 : आमीर फेल आता पाकिस्तानला फिरकीचा सहारा
sakal

बोलून बातमी शोधा

imad.jpg

World Cup 2019 : आमीर फेल आता पाकिस्तानला फिरकीचा सहारा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : मॅचेंस्टर : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेला पाऊस, त्यामुळे झाकलेली खेळपट्टी, आज सकाळी सामना सुरु झाल्यावर असलेले ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमदने लगेचच प्रथम गोलंदाजी स्वीकारली खरी. मात्र, महंमद आमीर, हसन अली आणि वहाब रियाझ निष्प्रभ ठरल्यामुळे सर्फराझला इमाद वसिम या फिरकी गोलंजाला आक्रमणावर लावण्याची वेळ आली.

त्यामुळे प्रथम गोलंदाजी करण्याचा त्याचा निर्णय चुकला असावा अशी चर्चा सुरु झाली. त्यातच महमंद आमीरला खेळपट्टीच्या मध्यावर आल्यामुळे दोन वॉर्निंगमुळे त्याला हा बदल करावा लागला. अशातच पाकिस्तानच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केल्याने रोहितला धावबाद करण्याची संधी दवडली. 

loading image