PAK vs SA : पाक - द. आफ्रिका सामन्यातही डकवर्थ लुईसचा गेम; पाऊस कोणाच्या येणार मुळावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs South Africa T20 World Cup 2022 Rain Stop Play DLS

PAK vs SA : पाक - द. आफ्रिका सामन्यातही डकवर्थ लुईसचा गेम; पाऊस कोणाच्या येणार मुळावर?

Pakistan Vs South Africa T20 World Cup 2022 : पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानने खराब सुरूवातीनंतर 185 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था 9 षटकात 4 बाद 69 धावा अशी केली आहे. मात्र भारत - बांगलादेश सामन्याप्रमाणे आजच्या सामन्यातही दुसऱ्या डावाची पाच षटके उलटून गेल्यानंतर पावसाने व्यत्यय आणाला आहे. त्यामुळे डकवर्थ लुईसचा खेळ पुन्हा एकदा खेळला जात आहे. सध्या डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिका 15 धावांनी पिछाडीवर आहे. डकवर्थ लुईस मेथर्डनुसार 9 षटाकात 84 धावा करणे आवश्यक आहे. आफ्रिकेच्या फक्त 69 धावा झाल्या आहेत. त्यामुळे ते 15 धावांनी पिछाडीवर आहेत.

कालच्या सामन्यात बांगलादेश 17 धावांनी आघाडीवर होती. तरी भारताने नंतर जोरदार पुनारागमन करत सामना जिंकला होता. आजच्या सामन्यात काय होते याची उत्सुकता लागून राहिली. दरम्यान, पावसाने उसंत घेतली आणि डीएलएस नुसार सामना 14 षटकांचा करण्यात आला. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 142 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आफ्रिकेने 9 षटकात 69 धावा केल्या असल्याने त्यांना 5 षटकात विजयासाठी 73 धावांची गरज आहे.

हेही वाचा: Pak Actor Shinwari : काही करुन भारताला हरवा, एका पायावर लग्नाला तयार! पाकिस्तानी अभिनेत्रीचं चँलेज

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर 4 बाद 43 अशी अवस्था झाली. त्यानंतर मोहम्मद नवाझ आणि इफ्तिकार अहदमने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 95 धावांपर्यंत पोहचवले. नवाझ 28 धावा करून बाद झाल्यानंतर शादाब खानने 22 चेंडूत 52 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तर इफ्तिकार अहमदनेही 35 चेंडूत 51धावांची खेळी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांच्या अर्धशतकी खेळी आणि 82 धावांचा भागीदारीमुळे पाकिस्तानने 20 षटकात 9 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा: Umesh Yadav : मला फसवू शकता मात्र देव सगळं पाहतोय लक्षात ठेवा! वेगवान गोलंदाजांचा निवडसमितीला बाऊन्सर

पाकिस्तानचे विजयासाठी ठेवलेले 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. त्यांनी पहिल्याच षटकात क्विटंन डिकॉकला गमावले. त्यानंतर वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारा रिली रॉसो 7 धावांची भर घालून माघारी परतला. यानंतर कर्णधार टेम्बा बाऊमा आणि एडिन माक्ररमने भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शादाब खानने बाऊमाला (36) आणि शाहीन आफ्रिदीने माक्ररमला (20) बाद करत आफ्रिकेची अवस्था 4 बाद 66 अशी केली. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. सामना थांबला त्यावेळी आफ्रिकेने 9 षटकात 4 बाद 69 धावा केल्या होत्या.

दरम्यान, पावसाने उसंत घेतली आणि डीएलएस नुसार सामना 14 षटकांचा करण्यात आला. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 142 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आफ्रिकेने 9 षटकात 69 धावा केल्या असल्याने त्यांना 5 षटकात विजयासाठी 73 धावांची गरज आहे.