पाकिस्तानचे कबड्डीपटूही लिलावात

पाकिस्तानचे कबड्डीपटूही लिलावात

मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच दोन देशांतील क्रीडासंबंध जवळपास संपुष्टात आले आहेत; पण त्याचवेळी प्रो-कबड्डी लीगच्या लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या १० कबड्डीपटूंचा समावेश आहे, त्यावरून वाद होण्याची शक्‍यता आहे.

प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या लिलावात पाकिस्तान खेळाडूंची खरेदी झाली होती; मात्र त्यांच्या सहभागावरून वाद झाला होता. तिसऱ्या मोसमात तर खरेदी केलेले पाकिस्तान कबड्डीपटू भारतात येऊच शकले नव्हते. चौथ्या मोसमातही त्यांचा सहभाग नव्हता. आताही त्यांच्या खरेदीसाठी फ्रॅंचाईज उत्सुक असण्याची शक्‍यता धूसरच आहे.

दरम्यान, या लीगच्या लिलावात पाकिस्तानसह  कोरिया, इराण, पोलंड, थायलंड, बांगलादेश, तैवान, जपान, केनया, इंडोनेशिया, नेपाळ, इंग्लंड, श्रीलंका, ओमान या परदेशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. प्रत्येक संघास किमान दोन परदेशी खेळाडू आपल्या संघात घेणे बंधनकारक आहे. देशातील, तसेच परदेशातील खेळाडूंची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटासाठी २० लाख, ‘ब’ गटासाठी १२ लाख, ‘क’ गटासाठी ८ लाख ही पायाभूत रक्कम आहे. नवोदित खेळाडूंसाठी सहा लाख हीच रक्कम असेल. प्रत्येक फ्रॅंचाईजला कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ खेळाडूंचा संघ करता येईल. त्यांना खेळाडूंवरील खर्चासाठी एकंदर ४ कोटी उपलब्ध असतील. 

पाकिस्तानचे लिलावातील खेळाडू
‘ब’ गट : अतीफ वहीद, अष्टपैलू ः प्रो-कबड्डीत एक लढत खेळला आहे, नासीर अली, बचावपटू (लेफ्ट कॉर्नर) ः प्रो-कबड्डीचा अनुभव नाही, वासीम सज्जाद, बचावपटू (राईट कॉर्नर) ः प्रो-कबड्डीत १७ लढतींत २७ पकडी, हसन रझा, आक्रमक ः प्रो-कबड्डीत एकही लढत नाही

‘क’ गट ः (सर्व खेळाडू नवोदित ) अखलाक हुसेन, अष्टपैलू, इबरार हुसैन, अष्टपैलू, अरसलान अहमद, आक्रमक, हसन अली, आक्रमक, महंमद इमरान, आक्रमक, उस्मान झादा, आक्रमक

राज्यातील नवोदित खेळाडू
सारंग देशमुख, आक्रमक, शुभम पालकर, आक्रमक, दुर्वेश पाटील, आक्रमक, मयूर शिवतरकर, अष्टपैलू, सुनील सिद्धगवळी, आक्रमक, मयूर बोम्मकांती, बचावपटू (राईट कव्हर), आनंद तोमर, आक्रमक
 

महाराष्ट्रातील खेळाडू
‘अ’ गट 
गिरीश इरनाक, बचावपटू (लेफ्ट कॉर्नर), विशाल माने, बचावपटू (राईट कॉर्नर), नीलेश शिंदे, बचावपटू (राईट कॉर्नर), सचिन शिंगाडे, बचावपटू (लेफ्ट कव्हर), काशीलिंग अडके, आक्रमक, रिषांक देवाडिगा, आक्रमक, नितीन मदने, आक्रमक, महेंद्र राजपूत, आक्रमक

‘ब’ गट
सय्यद आरिफ, बचावपटू (राईट कॉर्नर), प्रशांत चव्हाण, बचावपटू (राईट कॉर्नर), संकेत चव्हाण, बचावपटू (लेफ्ट कॉर्नर), बाजीराव होडगे, बचावपटू (राईट कव्हर), विलास काळे, बचावपटू (राईट कव्हर), महेंद्र सिंग, बचावपटू (राईट कॉर्नर), सुनील लांडे, बचावपटू (राईट कॉर्नर), आनंद पाटील, आक्रमक, नीलेश साळुंके, आक्रमक, सुलतान डांगे, आक्रमक

‘क’ गट
दादासाहेब आवाड, अष्टपैलू, सुयोग राजापकर, अष्टपैलू, योगेश सावंत, अष्टपैलू, सुशील भोसले, बचावपटू (लेफ्ट कव्हर), सचिन खांबे, बचावपटू (लेफ्ट कॉर्नर), नितीन मोरे, बचावपटू (लेफ्ट कव्हर), शशांक वानखेडे, बचावपटू (लेफ्ट कव्हर), अक्षय जाधव, आक्रमक, श्रीकांत जाधव, आक्रमक, उमेश म्हात्रे, आक्रमक, प्रवीण नेवाळे, आक्रमक, श्रीराम निंबोळकर, आक्रमक, तुषार पाटील, आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com