हार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत; संघातून बाहेर

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

रविवारी नेटमध्ये सराव करत असताना पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.

मोहाली - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेलाडू हार्दिक पांड्या याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले आहे.

मोहाली येथे इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि सलामीवीर लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाले होते. आता हार्दिक पांड्याचाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. भारतीय संघात पार्थिव पटेल आणि करुण नायर यांना स्थान देण्यात आले आहे. आता चौथ्या कसोटीपूर्वी खेळाडूंना तंदुरुस्त होण्याचे आव्हान असणार आहे.

बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नेटमध्ये सराव करत असताना पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याला संघातून वगळण्यात आले असून, लवकरच बदली खेळाडूबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच सलामीवीर लोकेश राहुललाही चौथ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे.

Web Title: Pandya suffers shoulder injury; released from squad