पंकज अडवाणीचे 16 वे जगज्जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई : पंकज अडवाणीने जागतिक बिलियर्डस स्पर्धेतील गुणांच्या प्रकारात जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने निर्णायक लढतीत पीटर गिलख्रिस्टचा 6-3 असा पाडाव करून ही कामगिरी केली.

पंकजने अनुभवी प्रतिस्पर्ध्यास मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत 151-33, 150-95, 124-151, 101-150, 150-50, 152-35, 86-150, 150-104, 150-15 असा विजय मिळविला. त्याने याचबरोबर ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. याचबरोबर त्याने वेळेच्या प्रकारातील बिलियर्डस विजेतेपद सात वेळा, जागतिक स्नूकर विजेतेपद दोनदा, जागतिक सिक्‍स रेड स्नूकर विजेतेपद दोनदा, तसेच जागतिक सांघिक बिलियड्‌‌‌स एकदा जिंकले आहे.

पंकजने उपांत्य फेरीत म्यानमारच्या आँग ताय याला कोणतीही संधी दिली नव्हती. त्याने तीन शतकी ब्रेक करीत सहज विजय मिळविला होता. जागतिक स्नूकर स्पर्धेत त्याला सुरवातीच्या फेरीत धक्कादायक हार पत्करावी लागली होती; पण त्याची पुरेपूर भरपाई पंकजने बिलियर्डस स्पर्धेत केली.

Web Title: Pankaj Advani wins World Billiards Championships title