माजी खेळाडू इरनेस्टो वलवेर्दे  बार्सिलोनाचे नवे प्रशिक्षक

पीटीआय
बुधवार, 31 मे 2017

पॅरिस - लुईस हेन्रिकेज यांनी सूत्रे खाली ठेवल्यानंतर बार्सिलोनाने आपल्या नव्या प्रशिक्षकपदी इरनेस्टो वलवेर्दे यांची नियुक्ती केली आहे. दोन दशकांपूर्वी ते बार्सिलोनाचे खेळाडू होते.

या अगोदर ॲथलेटिको बिल्बाओ क्‍लबचे प्रशिक्षक असलेले वलवेर्दे यांचा बार्सिलोनाबरोबरचा हा करार दोन वर्षांचा असणार आहे. १९८८ आणि १९९० मध्ये ते आघाडी फळीतून बार्सिलोना संघातून खेळलेले आहेत. योहान क्रायफ हे त्या वेळी बार्सिलोनाचे प्रशिक्षक होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नेदरलॅंड्‌सच्या इतर खेळाडूंप्रमाणे प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली.

५३ वर्षीय वलवेर्दे यांनी ॲथलेटिको बिलबाओ क्‍लबचे तरुण खेळाडू घडवण्यापासून प्रशिक्षकपदाची कारकीर्द सुरू केली. दोन वेगवेगळ्या टप्प्यांत मिळून ते सहा वर्षे या क्‍लबचे प्रशिक्षक होते. युरोपीय करंडक स्पर्धेत त्यांनी ॲथलेटिको बिलबाओला सहा वर्षांत पाचव्यांदा पात्रता मिळवून दिली होती. २०१५ मध्ये स्पॅनिश सुपर करंडक स्पर्धेत बार्सिलोनाचा ५-१ असा सरासरीवर पराभव करून बिलबाओला प्रथमच करंडक मिळवून दिला होता.

Web Title: Paris Former player Ernesto Valverde Barcelona's new coach