गुजरातने पहिल्यांदा जिंकला रणजी करंडक

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव - 228 व दुसरा डाव 411 (पृथ्वी शॉ 44, श्रेयस अय्यर 82, सूर्यकुमार यादव 49, आदित्य तरे 69- 114 चेंडू, 12 चौकार, अभिषेक नायर 91- 146 चेंडू, 5 चौकार, 5 षटकार; चिंतन गजा 39-10-121-6). पराभूत वि. 
गुजरात, पहिला डाव - 328 व दुसरा डाव 5 बाद 313 (पार्थिव पटेल 143, मनप्रीत जुनेजा 54)

इंदूर - बेचाळिसाव्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे मुंबईचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. पार्थिव पटेलच्या 143 धावांच्या खेळीमुळे गुजरातने मुंबईचे 312 धावांचे आव्हान पाच गडी राखून पूर्ण करत रणजी करंडक पटकाविला.

नकारात्मक मारा व वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या गुजरातला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी मिळाली होती. आज (शनिवार) सामन्याच्या अखेरच्या दिवशी गुजरातच्या फलंदाजांनी ती पूर्ण केली. 312 धावांच्या आव्हानासमोर गुजरातला आज बिनबाद 47 वरून प्रियांक पांचाळ आणि भार्गव मेराई यांना बाद करत बलविंदर सिंधूने गुजरातला दोन धक्के दिले. गोहेलही बाद झाल्यानंतर खेळात चुरस निर्माण जाली होती. पण, कर्णधार पार्थिव पटेलने मनप्रीत जुनेजाच्या साथीने शतकी भागीदारी करत मुंबईचे आव्हान संपुष्टात आणले.

जुनेजानेही अर्धशतक (54 धावा) पूर्ण केले. अखेर पार्थिव 143 धावांवर बाद झाल्यानंतर रुजूल भट्ट आणि चिराग गांधी यांनी नाबाद राहत गुजरातला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस विजेतेपदाचा कल स्पष्ट करणारा ठरला. गुजरातच्या सर्व प्रतिकाराचा सामना करत मुंबईने 411 धावा केल्या खऱ्या; परंतु पहिल्या डावातील 100 धावांची पिछाडी त्यांच्या मुळावर आली. 

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव - 228 व दुसरा डाव 411 (पृथ्वी शॉ 44, श्रेयस अय्यर 82, सूर्यकुमार यादव 49, आदित्य तरे 69- 114 चेंडू, 12 चौकार, अभिषेक नायर 91- 146 चेंडू, 5 चौकार, 5 षटकार; चिंतन गजा 39-10-121-6). पराभूत वि. 
गुजरात, पहिला डाव - 328 व दुसरा डाव 5 बाद 313 (पार्थिव पटेल 143, मनप्रीत जुनेजा 54)

Web Title: Parthiv 143 leads Gujarat to maiden title