KKR चा खेळाडू लग्नाआधीच होणार बाबा; गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल

becky boston
becky bostonInstagram

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत ऑक्सिजन खरेदीसाठी पुढे सरसावलेला क्रिकेटर लवकरच बाबा होणार आहे. त्याच्या गर्लफ्रेंडने यासंदर्भातील माहिती दिली असून ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज आणि कोलकाताचा स्टार खेळाडू पॅट कमिन्सची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलीय. आयपीएलच्या मैदानात कोलकाताच्या ताफ्यातून खेळणारा पॅट कमिन्स सध्या मालदीवमध्ये आहे. भारतातून मायदेशी परतण्यापूर्वी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याठिकाणी क्वांरटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. सीमेवरील निर्बंध हटल्यानंतरच ते ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

becky boston
BCCI चा स्थानिक खेळाडूंना दिलासा; IPL पुन्हा देशाबाहेर?

भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातून थेट ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या फ्लाईट्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. स्पर्धा निम्म्यावरच स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व्हाया मालदीव मायदेशी परतणार आहेत.

pat
patInstagram

बेकी बोस्टन हिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून 'बेबी बंप' फोटो शेअर केलाय. पॅट कमिन्स आणि बेकी अनेक दिवसांपासून डेटिंग करत आहेत. लवकरच दोघे विवाह देखील करणार आहेत. आयपीएलसाठी भारतात येण्यापूर्वी पॅट कमिन्सने इन्टावरुन एक पोस्ट लिहिली होती. यात त्याने स्पर्धेसाठी भारतात जाण्यास उत्सुक असून घर सोडणे मुश्कील असल्याचे म्हटले होते. याच वेळी त्याने बेकी बोस्टनसोबत लवकरच लग्न करेन, असेही स्पष्ट केले होते.

becky boston
IPL च्या उर्वरित सामन्यासाठी BCCI ला परदेशातून आली ऑफर

पॅट कमिन्सने भारतातील कोरोना लढ्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्याने तब्बल 37 लाख रुपये आर्थिक मदत केली होती. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या संघातील वरुन चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे सर्वात पहिल्यांदा समोर आले होते. त्यानंतर लागोपाठ कोरोना केस समोर आल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com