
IND vs AUS: संघाला मोठा धक्का! भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीतून हा खेळाडू बाहेर
Ind vs Aus 4th Test Match: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यातून मोठा एका दिग्गज खेळाडूला वगळला जाऊ शकते. या खेळाडूला मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातूनही वगळण्यात आले होते.
या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आपल्या देशात परतला होता. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापासून पॅट कमिन्स आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी सिडनीला गेला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पॅट कमिन्स सिडनीमध्येच राहणार आहेत. अशा स्थितीत पॅट कमिन्स चौथ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो. पॅट कमिन्स मायदेशी परतल्यानंतर तिसर्या कसोटीत स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवण्यात आले होते, त्यामुळे शेवटच्या सामन्यातही स्टीव्ह स्मिथ कर्णधार होऊ शकतो.
पॅट कमिन्सबद्दल अपडेट देताना ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, या कठीण काळात आमचे विचार अजूनही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत. आम्ही दररोज त्याच्याशी सतत संपर्कात आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसरी कसोटी 9 गडी राखून जिंकली. यापूर्वी स्टीव्ह स्मिथने 2014 ते 2018 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. तिसऱ्या कसोटीत कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ सामन्यानंतर म्हणाला, 'माझी वेळ संपली आहे. आता हा पॅट कमिन्सचा संघ आहे. मात्र पॅट कमिन्स भारतात परतला नाही तर तो स्टीव्ह स्मिथचे कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.