Pro Kabaddi : पाटणा पायरेट्‌सकडून युपीचा धुव्वा 

Patna Pirates demolish UP Yoddha
Patna Pirates demolish UP Yoddha

पाटणा - प्रदीप नरवालच्या आक्रमक चढायांना तेवढीच मोलाची साथ नवीनकुमारकडून बचावात मिळाल्याने पाटणा पायरेट्‌स संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात शुक्रवारी युपी योद्धाजचा 41-20 असा धुव्वा उडवला. घरच्या मैदानावर पाटणा संघाचा हा पहिलाच विजय ठरला. 

घरच्या मैदानावर पाटणा संघाने जणू लयच हरवली होती. प्रदीप नरवाल आपल्या चढायांच्या जोरावर गुण मिळवत होता. पण, त्याला सहकाऱ्यांकडून साथ मिळत नव्हती. आज हे जुळून आले. चढाईत नरवालने 12 गुणांची कमाई केली. त्याला याच आघाडीवर जॅक कून ली याची साथ मिळाली. त्याहीपेक्षा नीरजकुमारच्या भक्कम पकडीची जोड निर्णायक ठरली. त्याने पकडीचे सात गुण मिळविले. पाटणाच्या या धडाक्‍यापुढे युपीचा एकही योद्धा आपला खेळ दाखवू शकला नाही. चढाईत त्यांच्याकडून थोडा तरी प्रतिकार झाला. पण, बचावात ते 16-4 इतके मागे राहिले आणि तीन लोण त्यांना पत्करावे लागले. 

मुंबईचा पराभव  
त्यापूर्वी झालेल्या सामन्यात यु मुम्बा संघाला विश्रांतीला मिळविलेली आघाडी टिकवता आली नाही. अंतिम क्षणात केलेल्या चुकांमुळे त्यांना बंगाल वॉरियर्सकडून 32-30 असा पराभव पत्करावा लागला. बंगालच्या मनिंदरसिंगला प्रपंजनची साथ मिळाली. बलदेवसिंगच्या पकडी देखील सर्वोत्तम ठरल्या. अर्जुनने लढत एकाकी पडूनही मुंबईचे आव्हान जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या दोन चढायात 31-30 अशी स्थिती असूनही त्यांना बरोबरी साधता आली नाही. मनिंदरची पकडकरून त्यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, अखेरच्या चढाईत अर्जुनची पकड झाल्याने त्यांची बरोबरीची संधी हुकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com