द. आफ्रिकेत कोहलीचे वर्तन "विदुषका'सारखे होते: हॅरिस

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी कोहली याचे वर्तन विदुषकासारखे होते; मात्र यावर काहीही कारवाई झाली नाही. आयसीसीला बहुतेक रबाडा व दक्षिण आफ्रिकेच्या वर्तनामध्येच समस्या दिसली असावी

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली याचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वर्तन "विदुषका'सारखे होते; मात्र तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, अशी टीका दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल पॅरिस यांनी केली आहे.

कोहली व दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडा यांच्यामध्ये या दौऱ्यावेळी उडालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्‍वभूमीवर हॅरिस यांनी ही टीका केली आहे. या चकमकीच्या पार्श्‍वभूमीवर आयसीसीने रबाडाला दोषी ठरवित त्याच्यावर दोन कसोटी सामन्यांची बंदी लादली आहे.

"दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी कोहली याचे वर्तन विदुषकासारखे होते; मात्र यावर काहीही कारवाई झाली नाही. आयसीसीला बहुतेक रबाडा व दक्षिण आफ्रिकेच्या वर्तनामध्येच समस्या दिसली असावी,'' अशी टीका हॅरिस यांनी ट्‌विटरच्या माध्यमामधून केली आहे.

Web Title: Paul Harris Virat Kohli ICC South Africa