HappyBirthdayDhoni : क्रिकेट जगातला ध्रुवतारा!

Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni

त्याचा खेळ हा लाखो रूपये खर्चून घडलेल्या क्रिकेट अॅकेडमीतल्या खेळाडूसारखा नव्हता, त्याला फूटबाॅलची आवड होती पण अपघाताने तो क्रिकेटमधे आला. त्याच्याकडे क्रिकेटची शास्ञशुद्ध कला नव्हती. त्याची स्वःताचीच एक शैली होती. त्या शैलीचे आज जगभर चाहते निर्माण झाले. झारखंड सारख्या दुर्गम भागातून आलेला तो क्रिकेटच्या जगतातला 'ध्रुव तारा' झाला.
महेंद्रसिंह धोनी !

आज त्याचा वाढदिवस, गेली एक तप झाले त्याचे नाव भारतीय क्रिकेटमध्ये झळकत आहे. 2004 साली त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. खांद्यावर येणारे त्याचे केस पाहून असे वाटायचं जंगलातून उचलून संघात भरती केला की काय? विशाखापट्टणमला पाकिस्तान विरुद्धच्या 148 रनांच्या त्याच्या खेळीने मनात घर केले. पुढच्या श्रीलंकेच्या दौऱ्यातील खेळीने भारतीय संघात विकेटकीपरची जागा त्याने स्वःतासाठी राखीव केली.

तो खेळत गेला रेकॉर्ड बनत गेले, ICC च्या तिनही ट्राॅफ्री त्याच्या नेतृत्वात जिंकल्या. ICC कसोटी क्रमवारीत रसातळाला असणारा भारतीय संघ एक नंबरला आला. क्रिकेटच्या जगतातला तो एक ब्रॅण्ड झाला. ब्रॅण्ड होण्यामागे त्याचे अपार कष्ट, मिञांची मदत अशा अनेक गोष्टी आहेत. चार वर्ष त्याने 3 हजार रूपये पगाराने TC ची नोकरी केली. त्याच्या हातात यश आले पण त्याने तो कधी हुरळून गेला नाही. नेहमी इतरांना त्याचे श्रेय देत गेला. त्याच्या अंगी असलेल्या संयमाने तो सर्वांना भावला. तो एक यशस्वी फलंदाज, यष्टीरक्षक, कर्णधार झाला. धोनीचा हा प्रवास माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा देणारा आहे. सचिन आऊट झाल्यावर TV बंद करणारा मी धोनी क्रिकेटमध्ये आल्यापासून शेवटच्या बाॅलपर्यंत मॅच पाहू लागलो. कदाचित त्याने ती सवयच लावली. भारतीय क्रिकेटला सुवर्णयुग दाखवणाऱ्या या खेळाडूस माझा सलाम...

Happy Birthday Dhoni!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com