श्रीलंकेविरुद्ध खेळणार तर फक्त पाकिस्तानातच; पाकचा आडमुठेपणा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पाकिस्तानात खेळण्यास श्रीलंकेच्या खेळाडूंनी नकार दिल्यापासून अंधतारी राहिलेला श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या दौऱ्यातील सामने त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याचा पाठवलेला प्रस्ताव पाक क्रिकेट मंडळाने फेटाळला आहे. 

लाहोर : पाकिस्तानात खेळण्यास श्रीलंकेच्या खेळाडूंनी नकार दिल्यापासून अंधतारी राहिलेला श्रीलंका संघाचा पाकिस्तान दौरा आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या दौऱ्यातील सामने त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याचा पाठवलेला प्रस्ताव पाक क्रिकेट मंडळाने फेटाळला आहे. 

खेळाडूंच्या माघारीनंतर श्रीलंका पंतप्रधान कार्यालयानेही देखील श्रीलंका संघास धोका असल्याचे सांगून मालिका त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याची सूचना केली होती. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मालिकेतील सामने होतील, तर पाकिस्तानातच अशी ठाम भूमिका घेत त्रयस्थ केंद्रावर खेळण्यास नकार दिला आहे. 

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने याबाबत थेट वक्तव्य केले नसले, तरी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी त्रयस्थ केंद्रावर खेळण्याचा प्रश्‍नच येत नाही. ही मालिका ठरली तशीच होणार असे स्प÷ष्ट केले आहे. या मालिकेतील प्रत्येकी तीन एकदिवसीय, टी 20 सामने पाकिस्तानात लाहोर येथे होणार आहेत. 

श्रीलंका खेळाडूंची माघार आणि त्यानंतर श्रीलंका पंतप्रधान कार्यालयाने आपल्या संघाला धोका असल्याची दिलेली माहिती यावरून पाकिस्तानातील सुरक्ष व्यवस्थेचा फेर आढावा घेण्याचा विचार पाकिस्तान क्रिकेट मंडळ जरूर करत आहे. मात्र, त्रयस्थ केंद्रावर खेळण्याचा विचार करण्यास त्यांची तयारी नाही. मालिका त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याचा निर्णय झाल्यास पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या आमच्या प्रयत्नांना अपयश येईल अशी भिती त्यांना वाटत आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये पाकिस्तानातच श्रीलंका खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकाही संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्यांचे सर्व सामने त्रयस्थ केंद्रांवरच झाले आहेत. 

संघातील दहा प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्यानंतरही श्रीलंका क्रिकेट मंडळाने एकदिवसीय सामन्यांसाठी लाहिरु थिरीमन्ने आणि टी 20 सामन्यांसाठी दसून शनाका यांची कर्णधार म्हणून निवड केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCB denies to play at others grounds against Sri lanka