फेल्प्सने पटकाविले ऑलिंपिकमधील 19 वे सुवर्ण

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रिओ डी जानिरो - अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने ऑलिंपिक स्पर्धांतील 19 वे सुवर्ण मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शेवटची ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या फेल्प्सचे ऑलिंपिक स्पर्धांमधील 23 वे पदक आहे.

रिओ डी जानिरो - अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने ऑलिंपिक स्पर्धांतील 19 वे सुवर्ण मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शेवटची ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या फेल्प्सचे ऑलिंपिक स्पर्धांमधील 23 वे पदक आहे.

रिओ ऑलिंपिकमध्ये अमेरिका संघाने जलतरणात 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा अमेरिकेच्या संघात समावेश होता. फेल्प्सने रिलेमध्ये उडी घेतली तेव्हा तो दुसऱ्या स्थानावर होता. फ्रान्सचा जलतरणपटू सेलेब ड्रेसेल त्याच्या पुढे होता. पण, फेल्प्सने त्याला मागे टाकत 47.12 सेकंदात आपला राऊंड पूर्ण केला. अखेर अमेरिकेच्या संघाने 3 मिनिट 9.92 सेकंदात अंतर पार करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. फ्रान्सच्या संघाने 3 मिनिट 10.53 सेकंद आणि ऑस्ट्रेलियाने 3 मिनिट 11.37 सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक मिळविले.

फेल्प्सचे ऑलिंपिकमधील हे 19 वे सुवर्णपदक आहे. तर, त्याने दोन रौप्य आणि दोन ब्राँझ अशी पदके मिळविलेली आहेत. फेल्प्सने त्याच्या पहिल्याच अथेन्स ऑलिंपिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 ब्राँझ पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिंपिक 8 सुवर्णपदके मिळविली होती. त्यानंतर लंडन ऑलिंपिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके अशी कमाई केली होती. आता रिओ ऑलिंपिकमध्ये त्याने पहिले सुवर्णपदक मिळविले आहे.

Web Title: Phelps won the gold in the Olympics 19