प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून 'या' तगड्या उमेदवाराने आधीच घेतली माघार

phil simmons drawbacks his application for the post of Indian Coach
phil simmons drawbacks his application for the post of Indian Coach

मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाचा नंबर लागणार याचा निकाल आज लागणार आहे. आज सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनी माघार घेतली आहे. 

सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित केली आहेत. त्यांच्यासह माईक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स यांना तारीख व वेळ कळविण्यात आली आहे. यात टाइम झोनमुळे शास्त्रींची मुलाखत सर्वांत शेवटी होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com