फोगट परिवाराला थेट दक्षिण कोरियातून चहाचे आमंत्रण

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जुलै 2018

फोगट पिता पुत्रींवर आधारित आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या सिनेमाने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली. आता हाच सिनेमा पाहून प्रेरित झालेल्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या पत्नी किम जंग सुक या फोगट परिवाराची भेट घेणार आहेत.

चंदिगड : फोगट पिता पुत्रींवर आधारित आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या सिनेमाने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली. आता हाच सिनेमा पाहून प्रेरित झालेल्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या पत्नी किम जंग सुक या फोगट परिवाराची भेट घेणार आहेत.

'किम जंग सुक' यांनी मायदेशात काही भारतीय विद्यार्थ्यांनासह दंगल सिनेमा पाहिला आणि त्यांनी फोगट परिवाराला भेटीचे आमंत्रण दिले. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष मून जे हे आठ जुलै ते अकरा जुलै भारताच्या दौऱ्यावर आहेत. ''आम्हाला जंग सुक यांनी चहाचे आमंत्रण दिले असून हा आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. तसेच हा सिनेमा दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचे माध्यम बनल्याचा मला आनंद आहे.'' अशा शब्दात महावीर फोगट यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.   

भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या गीता आणि बबीता फोगट यांच्यावर आधारित दंगल सिनेमा 2016मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमा पाहिल्यानंतर जंग सुक यांनी फोगट परिवाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कोरियन दूतावास अधिकाऱ्यांनी फोगट परिवाराशी संपर्क साधल्याचे गीता फोगटचा भाऊ राहुल फोगटने सांगितले. 

Web Title: Phogat family invited over tea with South Korean first lady Kim Jung-sook

टॅग्स