Sports : शिवाजी मंडळ स्पर्धेच्या मुख्य फेरीत

फुलेवाडी संघाला ५-० गोल फरकाने नमवले
Football match
Football match sakal

कोल्हापूर - शाहू छत्रपती गोल्ड कप फुटबॉल अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघाला ५ विरुद्ध ० असे एकतर्फी नमवत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या शिवाजी मंडळ संघाने फुलेवाडी संघावर दबाव निर्माण केला. याउलट फुलेवाडी संघाने प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडळच्या बचाव फळीने उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंद्रेने गोल नोंदवत शिवाजी मंडळचे खाते उघडले.

Football match
Mumbai : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

यानंतर पूर्वार्धाच्या अधिकच्या वेळेत फुलेवाडीच्या संदीप पोवार याने धोकादायकरीत्या अडवल्याने शिवाजी मंडळला पेनल्टी बहाल करण्यात आली. विशाल पाटील याने गोल नोंदवून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात फुलेवाडी संघाची लय बिघडली. याचाच फायदा शिवाजी मंडळ संघाला झाला.

संकेत साळोखे याने ४१ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना ३-० असा केला. फुलेवाडी संघांकडून काही प्रयत्न होत असतानाच मोक्याच्या क्षणी मारलेल्या चुकीच्या फटक्यामुळे अनेक संधी वाया गेल्या. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला करण चव्हाण-बंद्रेच्या पासवर सुमित जाधव याने गोल नोंदवला, तर अधिकच्या वेळेत सुमित जाधवच्या पासवर करण चव्हाण-बंद्रे याने पाचवा गोल नोंदवला.

आजचा सामना

संध्याकाळी ४ : प्रॅक्टिस विरुद्ध बालगोपाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com