IPL 2020 : केकेआर सोडताच पियुष बोलला धोनीबाबत, लागू शकते चाहत्यांच्या जिव्हारी

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

आयपीएलच्या नव्या मोसमात नव्या संघासोबत नवी सुरवात करणारा पियुष चावला जुन्या चाहत्यांना रोष मात्र ओढावून घेण्याची शक्यता आहे. त्याने स्वत:हून हा धोका पत्करला आहे. चेन्नईत प्रवेश केल्यावर त्याने धोनी आणि चेन्नईच्या संघाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. 

नवी दिल्ली : कोलकता नाईट रायडर्सचा प्रमुख फिरकीपटू पियुष चावलाला पुढील आयपीएल मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. पियुष हा भारतीय खेळाडूंपैकी सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. चेन्नईमध्ये जाताच त्याने चेन्नई आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करणारे वक्तव्य केले आहे. मात्र, त्याच्या या वक्तव्यामुळे केकेआरचे चाहते मात्र नाराज होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपीएलच्या नव्या मोसमात नव्या संघासोबत नवी सुरवात करणारा पियुष चावला जुन्या चाहत्यांना रोष मात्र ओढावून घेण्याची शक्यता आहे. त्याने स्वत:हून हा धोका पत्करला आहे. चेन्नईत प्रवेश केल्यावर त्याने धोनी आणि चेन्नईच्या संघाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. 

Piyush Chawla

तो म्हणाला, "आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सीएसकेपेक्षा चांगला संघ आणि धोनीपेक्षा भारी कर्णधार असूच शकत नाही. एक खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमीच चांगल्या संघात, चांगल्या नेतृत्वात खेळायचे असते आणि चेन्नईपेक्षा चांगला संघ आणि माही भाईपेक्षा चांगला कर्णधार तुम्हाला मिळूच शकत नाही. मला आणखी कशाचीच गरज नाही.''  

IPL 2020 : लिलावानंतर कोणत्या संघात कोणते खेळाडू, बघा पूर्ण लिस्ट

त्याच्या या वक्तव्यामुळे कोलकत्याच्या चाहत्यांना मात्र नाराजी येऊ शकते. तो गेली अनेक वर्ष गौतम गंभूर आणि दिनेश कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली कोलकत्यात खेळला आहे. मात्र, त्याने धोनीला सर्वोत्तोम कर्णधार आणि चेन्नईला सर्वोत्तम संघ म्हटल्याने चाहते नाराज होऊ शकतात. 

चेन्नईने त्याला भारतीय खेळाडूंपैंकी सर्वाधिक 6.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. चेन्नईकडे याआधीच इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, हरभजनसिंग, रवींद्र जडेजा, मिचेल सॅंटनर यांसारखे फिरकीपटू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Piyush Chawla Risks Angering KKR Fans With His Comment For CSK And MS Dhoni