PKL 2021-22: पहिल्या चार दिवसांत लढतींचा तिहेरी धमाका

प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजला
PKL 2021-22: पहिल्या चार दिवसांत लढतींचा तिहेरी धमाका
PKL 2021-22: पहिल्या चार दिवसांत लढतींचा तिहेरी धमाकाsakal media

बंगळूर : कोरोनामुळे गेल्या वर्षी आयोजित न करण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीगचा यंदाच्या मोसमातील बिगुल दणक्यात वाजला. मशाल स्पोर्टस्‌ या प्रो कबड्डी लीगच्या आयोजकांकडून बुधवारी यंदाच्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यंदा प्रो कबड्डी लीगला सुरुवात २२ डिसेंबरपासून होणार आहे. २२, २३, २४ व २५ डिसेंबर या सुरुवातीच्या चार दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी तीन लढतींचा थरार जगभरातील कबड्डीप्रेमींना या वेळी पाहायला मिळणार आहे.

यू मुंबा व बेगळूरु बुल्स यांच्यामध्ये २२ डिसेंबरला सलामीची लढत रंगणार आहे. याच दिवशी आणखी दोन लढती खेळवण्यात येणार आहेत. तेलुगू टायटन्स-तमीळ थैलवास व बंगाल वॉरियर्स-यूपी योद्धा या चार संघांमधील लढाईही कबड्डीप्रेमींना या वेळी पाहायला मिळणार आहे. २२ डिसेंबरपासून सुरू झालेला पहिला टप्पा २० जानेवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी अर्थातच २५ डिसेंबर, १ जानेवारी, ८ जानेवारी व १५ जानेवारी या कालावधीत प्रत्येकी तीन लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

बंगळूरमध्ये होणार सर्व लढती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रो कबड्डी लीगच्या लढती एकाच शहरात खेळवण्यात येणार आहेत. बंगळूर येथील शेरटन ग्रँड व्हाईटफिल्ड हॉटेल व कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील लढती पार पडणार आहेत. तसेच प्रेक्षकांनाही या लढती पाहण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. प्रेक्षकांविना ही स्पर्धा पार पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com