खेळाडूंच्या पालकांना ॲक्रिडिएशन बंदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नवी दिल्ली - खेळाडूंचे पालक पदाधिकारी म्हणून जाण्यावरून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी वाद झाला होता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी कोणत्याही खेळाडूचे पालक भारतीय पथकाचा भाग नसतील, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

वडिलांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ॲक्रिडिएशन मिळाले नाही, तर स्पर्धेतून माघार घेईन, असा इशारा साईना नेहवालने दिला होता. साईनाच्या या धमकीनंतर तिचे वडील हरवीर सिंग यांना ॲक्रिडिएशन मिळाले, तसेच त्यांचा मुक्कामही क्रीडानगरीत होता. सिंधूची आईही भारतीय पथकाचा भाग होती. त्यांचा मुक्कामही क्रीडानगरीत होता. 

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही वडिलांना ॲक्रिडिएशन देण्यासाठी साईनाने विनंती केली, पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने ती फेटाळली आहे. खेळाडूंच्या पालकांना ॲक्रिडिएशन मिळणार नसल्याचे सर्व क्रीडा महासंघांना भारतीय ऑलिंपिक संघटनेने कळविल्याचे वृत्त आहे. 

मग, तिकिटाची खात्री द्या 
आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नावे पाठविण्याची अखेरची तारीख ३० एप्रिल होती. भारतीय ऑलिंपिक संघटनेने मला तुझ्यासोबत कोण असेल हे विचारले आहे. त्यानुसार मी नावे दिली आहेत, त्यांनी त्याबाबत काही सांगितले आहे का, अशी विचारणा साईनाने केली.

वडिलांचा क्रीडानगरीत मुक्काम असावा यासाठी माझा आग्रह नाही. त्यांच्या हॉटेलचा खर्च मी करू शकते. मला त्यांच्यासाठी ॲक्रिडिएशन किंवा किमान तिकिटे तरी हवी आहेत. तिकिटांचे पैसेही देण्याची तयारी आहे, त्यांनी माझे सर्व सामने बघावेत, असेच मला वाटते, असे साईनाने सांगितले.

Web Title: player parent accreditation ban by indian olympic association