पोरीनं घरी सोनं आणलं; पंतप्रधान मोदींकडून सिंधूचं कौतुक

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर आज तिचे भारतात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेत तिचे तोंडभरुन कौतुकही केले. 

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर आज तिचे भारतात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेत तिचे तोंडभरुन कौतुकही केले. 

Image

दिल्ली विमानतळावर आल्यावर सर्वांनी तिचे धूमधडाक्यात स्वागत केले. त्यानंतर तिने मोदींची आणि क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीही तिचे कौतुक केले. 

तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदके झाली आहेत. यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यात 15 सामने झाले होते. त्यापैकी सिंधूने 8 सामन्यांत बाजी मारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Congratulates PV Sindhu