Euro चा हिरो! सलामीच्या लढतीत रोनाल्डोचा विक्रमी गोल

युरो चषकात सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम आता रोनाल्डोच्या नावे झालाय.
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo twitter

UEFA Euro 2020 Cristiano Ronaldo Record : पोर्तुगालचा कर्णधार आणि फुटबॉल जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलामीच्या लढतीत दोन गोल डागत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाचव्यांदा युरो स्पर्धेत उतरलेल्या रोनाल्डोने सामन्यातील पहिला गोल डागताच खास विक्रम आपल्या नावे केला. युरो चषकात सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम आता रोनाल्डोच्या नावे झालाय. युरो कपमध्ये त्याच्या खात्यात आता 11 गोलची नोंद झालीये. त्याने फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू मायकल फ्लातिनी याचा विक्रम मागे टाकला. फ्रान्सच्या दिग्गज फुटबॉलपटूच्या नावे युरो कपमध्ये 9 गोलची नोंद आहे.

Cristiano Ronaldo
अखेरच्या क्षणी रोनाल्डोचा डबल बार; पोर्तुगालचा 3-० असा विजय

पहिला हाफ गोलविरहित राहिल्यानंतर राफेल गुरेरो याने पोर्तुगालसाठी पहिला गोल नोंदवला. त्याने 84 व्या मिनिटाला सिल्वाच्या पासवर अप्रतिम गोल करत पोर्तुगाल संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 87 व्या मिनिटाला हंगेरीच्या ऑर्बनने फॉल केला. आणि रेफ्रीने त्याला येलो कार्ड दाखवत पोर्तुगालला पेनल्टी दिली. यावेळी रोनाल्डोने कोणतीही चूक न करता पोर्तुगालसाठी दुसरा गोल डागला. या गोलसह त्याने युरोच्या यंदाच्या हंगामातील वैयक्तिक गोलचे खातेही उघडले. एवढचे नाही तर पेनल्टीवरील गोलनंतर तो युरोत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर पाच मिनिटातच राफा सिल्वाच्या पासवर रोनाल्डोने संघासाठी तिसरा आणि स्वत:चा दुसरा गोल केला. त्याच्या खात्यात आता युरो स्पर्धेत 11 गोल झाले आहेत.

Cristiano Ronaldo
कोक हटवून रोनाल्डोनं दाखवली पाण्याची बाटली; व्हिडिओ व्हायरल

युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो 2004 पासून युरो स्पर्धेच पोर्तुगालचे प्रतिनिधीत्व करत आहे. रोनाल्डो सध्या 36 वर्षे 130 दिवस एवढ्या वयाचा आहे. मोठ्या स्पर्धेत पोर्तुगालकड़ून गोल करणारा तो सर्वात वयोवृद्ध खेळाडूही ठरलाय. यापूर्वी हा विक्रम पोर्तुगालच्या पेपेच्या नावे होता. 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये 35 वर्षे 124 days वयात त्याने गोल केला होता. याशिवाय आणखी एक रेकॉर्ड रोनाल्डोने आपल्या नावे केलाय. युरो स्पर्धेतील एकाच सामन्यात दोन गोल करणारा रोनाल्डो सर्वात वयोवृद्ध खेळाडूही ठरलाय. यापूर्वी 35 वर्ष 265 दिवस वयात अँड्री शेवचेन्को याने दोन गोल डागले होते. सलामीच्या सामन्यातच रोनाल्डोने अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत आणखी काही खास विक्रम त्याला खुणावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com