पॉवरलिफ्टिंगमध्ये गणेश वायंगणकर, डॉ. सुनेत्रा ढेरे यांना सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ठाणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित सीनियर, नौवासिस, पुरुष व महिला राज्य पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग संघाने सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या गणेश वायंगणकर व प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.

वेंगुर्ले - ठाणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित सीनियर, नौवासिस, पुरुष व महिला राज्य पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग संघाने सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडच्या गणेश वायंगणकर व प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.

या स्पर्धेत राज्यभरातून ३०० पॉवरलिफ्टिंग खेळाडू विविध १५ गटांतून सहभागी झाले. विजेत्यांना नगरसेवक प्रकाश शिंदे, ठाणे असोसिएशन अध्यक्ष संभाजी सूर्यराव, रामदास खरात यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, कांस्यपदके, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्गच्या संघाला जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी व कोच दिलीप नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

विजेत्या खेळाडूंचे व संघाचे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कराज कोले, मधुकर दरेकर, नगराध्यक्ष तथा जिल्हा पॉवरलिफ्टिंग उपाध्यक्ष दिलीप गिरप, राजू बेग, राज्य सेक्रेटरी भारत श्री सैंदल सोंडे, जॉईंट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे डॉ. गणेश मर्गज, प्रवीण नाईक, कल्पना सावंत, सिद्धेश नाईक, दीपक राऊळ, बॉडी टेंपल असोसिएशनचे प्रवीण गुरव, मंगेश घोगळे यांनी अभिनंदन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In powerlifting Ganesh Wayangankar, Dr. Sunetra Dhare wins gold