भारताच्या प्रणॉयची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

बर्मिंगहॅम (इंग्लंड) - प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉय याने विजयी सलामी दिली. त्याने बुधवारी झालेल्या सामन्यात चीनच्या क्वाआओ बीन याचा 17-21, 22-20, 21-19 असा पराभव केला.

बर्मिंगहॅम (इंग्लंड) - प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉय याने विजयी सलामी दिली. त्याने बुधवारी झालेल्या सामन्यात चीनच्या क्वाआओ बीन याचा 17-21, 22-20, 21-19 असा पराभव केला.

त्यापूर्वी, भारताची सुरवात निराशाजनक झाली. सौरभ आणि समीर वर्मा बंधूचे एकेरीतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांनी पात्रता फेरीत पहिली लढत जिंकून झकास सुरवात केली. मात्र, दुसऱ्या फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत मुख्य फेरीत भारतीयांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी. सुमिथ रेड्डी यांना यजमान इंग्लंड, तर महिला दुहेरीत जे. मेघना आणि पूर्विषा एस. राम यांना तैवानच्या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला.

प्रणॉयचा संघर्ष
प्रणॉयला पहिल्या फेरीत लय गवसली नव्हती. सुरवातीपासून सतत आघाडीवर असणाऱ्या बिनला त्याने 8-8 असे गाठले होते. पण, नंतर सलग तीन गुण घेत 11-8 अशी आघाडी घेणाऱ्या बीनने ती अखेरपर्यंत टिकवून ठेवली. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने सलग 7 गुण घेत 7-0 अशी मोठी आघाडी घेतली. एकवेळ त्याने 20-15 अशी टिकवली होती. पण, त्याचवेळी बिन याने सलग पाच गुण घेत त्याला गेम पॉइंटपासून दूर ठेवत रंगत आणली. लढत 20-20 अशी बरोबरी असताना प्रणॉयने झटपट दोन गुण वसूल करत दुसरी गेम जिंकली. पहिल्या दोन्ही गेमपेक्षा तिसरी गेम जबरदस्त झाली. दोघेही गुणांसाठी धडपडत होते. पहिल्या गुणापासून बाराव्या गुणापर्यंत लढत बरोबरीतच चालू होती. बिनने त्या वेळी सलग पाच गुणांची नोंद घेत 17-12 आणि नंतर 19-16 अशी आघाडी वाढवली. या वेळी बिनला दोन मॅच पॉइंट साधता आले नाहीत. उलट प्रणॉयने अधिक अचूक खेळ करत सलग पाच गुणांची नोंद घेत गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Pranoy wins India