मॅटर्निटी लिव्हवर असूनही सेरेना नंबर वन

serena williams
serena williams

लंडन - गरोदर असल्यामुळे कोर्टपासून दूर असली तरीही सेरेना विल्यम्स जागतिक क्रमवारीत अव्वल बनली आहे. जर्मनीची अँजेलिक केर्बर मागे पडली. 

मागील वर्ष ऑलिंपिकचे असल्यामुळे काही स्पर्धांचा कार्यक्रम बदलला. त्यामुळे अँजेलिक स्टुटगार्टमधील स्पर्धेचे गुण राखू शकली नाही. त्यामुळे तिचे गुण कमी झाले. याचा सेरेनाला फायदा झाला. त्यामुळे टेनिसप्रेमींमध्ये क्रमवारीतील बदल चर्चेचा विषय ठरला. 

अँजेलिक आता याच आठवड्यात होत असलेल्या स्टुटगार्टमधील स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून सेरेनाला मागे टाकू शकेल. गेल्या वर्षाच्या तुलनेत स्टुटगार्टची स्पर्धा यंदा एक आठवडा उशिरा होत आहे. सेरेना सुमारे तीन महिने खेळलेली नाही. ऑस्ट्रेलियन ओपननंतर तिने ब्रेक घेतला. याविषयी चर्चेला वेग येत असतानाच तिने गरोदर असल्याचे जाहीर केले. 

केर्बर गेल्या मोसमात रोम, माद्रिद आणि फ्रेंच ओपनमध्ये पहिल्याच फेरीत हरली. या वेळी तिचा फॉर्म तुलनेने चांगला आहे. त्यामुळे स्टुटगार्टमध्ये जमले नाही तरी ती लवकरच सेरेनाला मागे टाकेल. 

महिला एकेरीची क्रमवारी (पहिले 10 क्रमांक) - 1) सेरेना विल्यम्स (अमेरिका 7010), 2) अँजेलिक केर्बर (जर्मनी 6925), 3) कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक प्रजासत्ताक 6020), 4) डॉमिनिका सिब्यूल्कोवा (स्लोव्हाकिया 5,065), 5) सिमोना हालेप (रुमानिया 5021), 6) गार्बीन मुगुरुझा (स्पेन 4691), 7) योहाना कॉंटा (ब्रिटन 4330), 8) ऍग्नीस्का रॅडवन्स्का (पोलंड 4205), 9) स्वेतलाना कुझ्नेत्सोवा (रशिया 4025), 10) मॅडीसन कीज (अमेरिका 3857) 

नदाल पुन्हा टॉप फाईव्हमध्ये 
मॉंटे कार्लोमध्ये दहाव्यांदा मास्टर्स स्पर्धा जिंकल्यामुळे स्पेनच्या रॅफेल नदाल याला मोठा फायदा झाला. तो पुन्हा टॉप फाईव्हमध्ये आला आहे. आता तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने दोन क्रमांक प्रगती केली. नदालकडून अंतिम फेरीत हरलेला देशबांधव अल्बर्ट रॅमोल-विनोलास याने पाच क्रमांक प्रगती केली. तो 19व्या स्थानावर आहे. कारकिर्दीतील हा त्याचा सर्वोत्तम क्रमांक आहे. अल्बर्टने ब्रिटनचा अँडी मरे आणि क्रोएशियाचा मरिन चिलीच यांना हरवून अनपेक्षित निकाल नोंदविले. 

पुरुष एकेरीची क्रमवारी - 1) अँडी मरे (ब्रिटन 11,690), 2) नोव्हाक जोकोविच (सर्बिया 8,085), 3) स्टॅन वॉव्रींका (स्वित्झर्लंड 5,695), 4) रॉजर फेडरर (स्पेन 5125), 5) रॅफेल नदाल (स्पेन 4,235), 6) मिलॉस राओनीच (कॅनडा 4165), 7) केई निशीकोरी (जपान 4,010), 8) मरिन चिलीच (क्रोएशिया 3,565), 9) डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया 3,385), 10) डेव्हिड गॉफीन (बेल्जियम 2,975) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com