Prithvi Shaw Case Sapna Gill : पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांनी सपना गिलला बोलवून घेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw Case Sapna Gill

Prithvi Shaw Case Sapna Gill : पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांनी सपना गिलला बोलवून घेत...

Prithvi Shaw Case Sapna Gill : पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया स्टार सपना गिल यांच्यात सेल्फीवरून वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं होतं. या प्रकरणी सपना गिलला अटक देखील झाली होती. मात्र तिची जामीनावर सुटका झाली. यानंतर तिने पृथ्वी शॉवर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

आता मुंबई पोलिसांनी या तक्रारीसंदर्भात सपना गिलचा स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ झाली आहे. गिलने पृथ्वी शॉने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. सपना गिलने आयपीसी कलम 34, 120 ब, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 (विनयभंग), 509 या कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरनुसार पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र पहाटे 4 वाजचा कॅफेमध्ये डिनर करत होते. त्यावेळी गिल आणि त्याच्या मित्रांनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. शॉने काही सेल्फी काढू ही दिले. मात्र गिल आणि त्यांचे मित्र अणखी सेल्फीची मागणी करू लागले. मात्र शॉने याला नकार दिला. यावेळी शॉने तो मित्रांसोबत डिनर करण्यासाठी आला आहे. त्याला कोणी डिसटर्ब करू नये अशी इच्छा आहे असे सांगितले.

दरम्यान, पोलिसांना दिलेल्या दोन पानाच्या स्टेटमेंमध्ये सपना गिलने आरोप केला की, ती 15 फेब्रुवारीला एका हॉटेलमध्ये पार्टी करत होती. त्यावेळी क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांच्या समुहाने तिला जोरात कानाखाली मारली आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श केला असे गिलचे वकील अली काशिफ खान यांनी सांगितले. गिलने आपल्या तक्रारीत शॉ आणि त्याचे मित्र हे दारू प्यायले होते असेही सांगितले.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...