पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला शुक्रवारी सकाळी सराव सामन्यात दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. 

सिडनी : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला शुक्रवारी सकाळी सराव सामन्यात दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ डीप मि़ड विकेटला  क्षेत्ररक्षण करत होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स ब्रायन्ट याचा झेल घेताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला पाय खाली ठेवणेही अशक्य होऊ लागल्याने त्याला मैदान सोडून जावे लागले. प्राथमिक चाचणीनंतर त्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. 

 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : भारताला धक्का; पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीतून बाहेर

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: Prithvi Shaw ruled out of 1st test