INDvsAUS : सलामीवीर ढेपाळले; त्यात पृथ्वी शॉही मालिकेतून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभवाचे ढग जमा झालेले असताना उरलेल्या दोन सामन्यात कसोटी पणास लागणार आहे. पृथ्वी शॉच्या तंदुरुस्तीचा आढावा घेतल्यानंतर तो पुढच्या दोन्ही सामन्यात खेळू शकणार नाही.

मुंबई : सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाय दुखावलेला सलामीवीर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यातूनही बाहेर गेला आहे. त्याऐवजी मयांक अगरवाल आणी तंदुरुस्तीबरोबर फॉर्मही दाखवणाऱ्या हार्दिक पंड्याचा भारतीय संघात तातडीने समावेश करण्यात आला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभवाचे ढग जमा झालेले असताना उरलेल्या दोन सामन्यात कसोटी पणास लागणार आहे. पृथ्वी शॉच्या तंदुरुस्तीचा आढावा घेतल्यानंतर तो पुढच्या दोन्ही सामन्यात खेळू शकणार नाही.

त्याचबरोबर केएल राहुलही खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे मयांक अगरवालची निवड करण्यात आली आहे. 

हार्दिक पंड्याही कंबरेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. परंतु तंदुरुस्ती मिळवल्यांतर तो मुंबईविरुद्धचा रणजी सामना खेळता त्यात त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चमक दाखवली त्यामुळे त्याचाही तातडीने संघात समावेश केला आहे. तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे.

Web Title: Prithvi Shaw ruled out of entire Australia tour due to injury, Hardik Pandya to return