मूकबधिर टेनिसमध्ये पृथ्वी जगज्जेता

पृथ्वी शेखर
पृथ्वी शेखर

मुंबई : पृथ्वी शेखरने जागतिक मूकबधिर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तुर्कीत झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीला दुहेरीत ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले होते, पण त्याची पुरेपूर भरपाई त्याने एकेरीत केली.

पृथ्वीने अंताल्या येथे झालेल्या स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. त्याने निर्णायक लढतीत चेक प्रजासत्ताकच्या यारोस्लाव स्मेदेक याला 6-4, 6-3 असे पराजित केले. चेन्नईत सुरेशकुमार सोनाचालम यांचे मार्गदर्शन लाभत असलेल्या पृथ्वीचे विजेतेपद धक्कादायकच होते. त्याला या स्पर्धेत मानांकन नव्हते तरीही त्याने विजेतेपदास गवसणी घातली.

अव्वल मानांकित गॅबॉर मॅथे (हंगेरी) याला पराजित करून पृथ्वीने आशा उंचावल्या होत्या. या 26 वर्षीय भारतीय टेनिसपटूने या स्पर्धेत एकंदर चार मानांकित खेळाडूंना पराजित केले. त्याने प्रशांत दशरथ हारासंभवी याच्या साथीत दुहेरीत ब्रॉंझ जिंकले होते. त्यांनी या लढतीत तिसऱ्या मानांकित मारिओ कार्गी-जर्गन शूत्झ (ऑस्ट्रिया) यांना 6-3, 6-0 हरवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com