प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरची एसएनबीपी संघावर मात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.

पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
नेहरूनगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रतीक्षा सातवने केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर संघाने एसएनबीपी संघावर 10-3 अशा फरकाने विजय प्राप्त केला. या सामन्यात
एसएनबीपी अकादमीच्या खेळाडूंनी जोरदार खेळ केला. त्यांच्या अंजली सरोदेने खेळाच्या चौथ्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडले ईस्टर पंड्याने आठव्या मिनिटास दुसरा तर अंजली सरोदेने दहाव्या मिनिटास तिसरा गोल केला होता. परंतु मिळालेली ही आघाडी इतर खेळाडूंची विशेष साथ न मिळाल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले, तर प्रियदर्शनीकडून प्रतीक्षा सातवने (7, 9, 21 व 24 वे मिनीट) चार गोल केले तिला शिवानी बावडेकरने (17 व 18 वे मिनीट) दोन तर जस्मिन शेख (16 वे मिनीट), एस. प्रेसी (19 वे मिनीट), शिवानी बिश्‍त (22 वे मिनीट) आणि प्रगती जेआगेने (27 वे मिनीट) प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली.
पुरुष गटातील पहिल्या लढतीत अर्थव कांबळेने नोंदविलेल्या पाच गोलच्या जोरावर प्रियदशर्नी
स्पोर्टस सेंटर संघाने फ्रेंन्ड्‌स युनियन संघाचा 14-1 असा पराभव केला. या सामन्यात प्रियदशर्नीच्या प्रणव मानेने तिसऱ्याच मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडल्यानंतर अर्थव कांबळेने तब्बल (4, 11, 13, 14 व 25 वे मिनीट) पाच गोल केले त्याला अजिंक्‍य काळभोर (5 व 8 मिनीट), अमन शर्मा (7 व 15 वे मिनीट), साजिद शहाने (9 व 27 वे मिनीट) प्रत्येकी दोन तर अब्दुल सलमानी (12 वे मिनीट) आणि आदर्श जाधवने (22 वे मिनीट) प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली. फ्रेंन्ड्‌स युनियन संघाकडून एकमेव गोल रेहान शेखने 28 व्या मिनिटास केला.
Web Title: Priyadarshani sports center won against SNBP