प्रो कबड्डीतूनही अनुपकुमार बाहेर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - आयपीएल खालोखाल देशात प्रसिद्ध असलेल्या प्रो कबड्डीच्या नव्या मोसमासाठी १२ पैकी नऊ संघांनी आपल्याकडे कायम ठेवलेल्या (रिटेन) खेळाडूंची यादी जाहीर केली. यू मुम्बाने कोणालाच ‘रिटेन’ न केल्यामुळे अनुप आता प्रो कबड्डीलाही अलविदा करणार याची चर्चा रंगू लागली आहे.

त्याचबरोबर गतस्पर्धेत सर्वाधिक किंमत मिळालेला नितीन तोमर, पुण्याचा दीपक हुडा; तसेच कबड्डीचा चेहरा असलेल्या राहुल चौधरीलाही तेलुगू संघाने कायम ठेवले नाही.

भारतीय कबड्डीचा सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अनुपला भारतीय संघातूनही वगळण्यात आलेले आहे. यू मुम्बा आणि अनुप हे समीकरण पहिल्या स्पर्धेपासून तयार झाले होते. आता यू मुम्बानेच त्याला कायम न राखल्यामुळे अनुपच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

यूपी योद्धा संघाने गतवर्षी नितीन तोमरसाठी ९३ लाखांची बोली लावली होती; परंतु यंदा त्याला संघात कायम ठेवले नाहीत. इतकेच नव्हे तर गतमोसम गाजवणारा आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणाऱ्या रिशांक देवाडिगालाही प्राधान्य दिले नाही. यू मुम्बाप्रमाणे त्यांनीही कोणाला रिटेन केले नाही. जयपूर संघही गतवर्षाप्रमाणे यंदाही सर्व खेळाडू लिलावातूनच निवडणार आहेत.

    रिटेन झालेले २१ खेळाडू, यामध्ये दोन परदेशी
    पुण्याचा गतवेळचा कर्णधार दीपक हुडाला वगळले
    अनुपसह मनजित, जसवीरसारख्या सीनियर्सचे भवितव्य अधांतरी
    पाटणाने चार खेळाडू कायम ठेवले
    गुजरातकडून फझल अत्राचली, अबोझर यांनाही प्राधान्य दिले नाही

Web Title: pro kabaddi anupkumar