सांघिक कामगिरी हीच बंगळूरची ताकद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमात ‘ब’ गटात बंगळूर बुल्स संघ आपली आघाडी कायम राखून आहे. त्यांनी मिळविलेले एकूण गुण सर्व संघांच्या कामगिरीत सातव्या स्थानावर दिसत असले, तरी त्यांनी गुणांच्या सरासरीत सर्व संघांना मागे टाकले आहे. एकूण आणि चढाईमध्ये मिळविलेल्या गुणांची त्यांची सरासरी अन्य संघांपेक्षा खूप उजवी ठरली आहे. त्यामुळेच त्यांच्या कामगिरीच्या उंचावलेल्या आलेखात त्यांच्या सांघिक कामगिरीचा वाटा मोठा असल्याचे स्पष्ट होते.

पवनच तारणहार
यंदाच्या मोसमात पवनकुमार शेरावतने जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्या चढाईतील २३३ गुणांपैकी १३१ गुण हे एकट्या पवनचे आहेत. यात त्याचे १२४ टच पॉइंट, तर ७ बोनस गुण आहेत. त्याने ९ सुपर रेड केल्या आहेत.

तिकीट विक्री -
कुठे - दै. सकाळ, बुधवार पेठ, पंडित फार्म (कर्वेनगर),  शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे बालेवाडी) 
वेळ - सकाळी १० ते संध्या. ६
संकेतस्थळ - www.bookmyshow.com 

Web Title: Pro Kabaddi Bangaluru Bulls