हरियानाकडून यू मुम्बाचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू, सोबत फॉर्मात असलेला रोहित बलियान, रोहित राणा असे खेळाडू असतानाही मुंबईची वाटचाल अडखळत होती. मध्यंतराला १७-१६ अशी एका गुणाची आघाडी मुंबईची लय बिघडल्याचे दर्शवत होती. 

सिद्धार्थ देसाईने सुपर टेन केले खरे; परंतु त्याच्या सात पकडीही झाल्या. ऐन वेळी तो बाद झाला आणि मुंबईला वारंवार आघाडी गमवावी लागली. दीड कोटी रुपयांची किंमत मिळालेला मोनू गोयत न्याय देऊ शकला नाही; परंतु विकास कंडोलाने १५ गुण मिळवत हरियानाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. मध्यंतरानंतर मुंबईवर लोण स्वीकारण्याची वेळ आली. तरी २९-२७ अशी घेतलेली आघाडी त्यांना टिकवता आली नाही. एरवी कमालीच्या पकडी करणाऱ्या फझलकडूनही आज चुका झाल्या. 

मेराज शेखने निर्णायक तिसऱ्या चढाईच्या वेळी गुण घेतल्यामुळे दिल्लीने अनुप कुमारच्या जयपूर पिंक पॅंथर्सला ४०-२९ असे सहज पराजित केले. मेराजने एकाच चढाईत तिघांना टिपत दिल्लीस बरोबरी साधून दिली. त्यानंतर ते कधीही मागे पडले नाहीत.

Web Title: Pro Kabaddi Competition Haryana and UMumba