PKL 2021 : पुन्हा टाय-टाय फिनिश! दिल्ली-गुजरात तगडी फाईट

PKL 2021
PKL 2021Twitter

Pro Kabaddi League 2021 : दबंग दिल्ली केसी (Dabang Delhi KC) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात तगडी फाईट बघायला मिळाली. प्रो कबड्डीच्या 8 व्या हंगमातील पाचव्या दिवशी दिल्ली आणि गुजरात यांच्यातील लढत 24-24 अशी बरोबरीत सुटली. या सामन्यात एका एका गुणांसाठी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. दिल्लीकडून रेडर नवीन कुमारने सर्वाधिक 11 गुण मिळवले तर गुजरातकडून राकेश नरवाल सर्वाधिक 9 गुणांची कमाई केली.

बंगळुरुच्या शेराटन ग्रँड, व्हाइटफील्ड येथ यंदाच्या हंगामातील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. यंदाच्या स्पर्धेतील आतापर्यंतचा दुसरा सामना बरोबरीत सुटला आहे. सलामीच्या दिवशी तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यातील सामना 40-40 असा बरोबरीत सुटला होता.

PKL 2021
SA vs IND : राहुलच्या शतकाशिवाय ही गोष्टही राहिली चर्चेत

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात गुजरातने सातव्या मिनिटाला आघाडी घेतली होती. त्यांनी स्कोअर 6-5 वर नेला. पिछाडीवरुन दमदार खेळ करुन हाफ टाईमपर्यंत दिल्लीच्या संघाने 12-11 असा सामना आपल्या बाजूनं वळवला. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंनी चिवट खेळ केला. दबंग दिल्लीने 12 तर गुजरातने 13 गुण मिळवले परिणामी सामना बरोबरीत सुटला.

PKL 2021
असला रोमान्स नको रे बाबा; कोहलीनं पुन्हा केली तीच चूक

दबंग दिल्लीचा संघ 13 गुणांसह अव्वलस्थानावर आहे. अद्याप त्यांनी एकही पराभव स्विकारलेला नाही. दुसरीकडे गुजरातचा संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या एका सामन्यात बंगळुरु बुल्सने (Bengaluru Bulls) अवघ्या एका गुणाने बाजी मारत बंगळुरु बुल्सला पराभूत केले. या मॅचचा स्कोअर 36-35 असा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com