Pro Kabaddi Points Table : दिल्लीची 'दंबगगिरी'; यू मुम्बाची घसरण

Pro Kabaddi Points Table
Pro Kabaddi Points TableTwitter

VIVO Pro Kabaddi Points Table : प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या चार दिवसांत रंगलेल्या लढतींमध्ये कमालीचा थरार अनुभवायला मिळाला. प्रत्येक संघाने दोन-दोन सामने खेळले असून दबंग दिल्ली (Dabang Delhi) गुणतालिकेत सर्वाधिक गुणांसह टॉप गियरमध्ये आहे. त्यांनी दोन्ही सामन्यात दमदार विजय नोंदवला असून आपल्या खात्यात 10 गुण जमा केले आहेत. 15 गुणांच्या फरकाने त्यांनी हे विजय नोंदवले आहेत. त्यांच्या पाठोपाठ बंगाल वॉरियर्सचा (Bengal Warriors) संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनीही दबंग दिल्ली प्रमाणे दोन्ही सामने जिंकून 10 गुणांची कमाई केली आहे. पण 8 गुण फरकामुळे ते दिल्लीच्या कुठेतरी थोडे मागे दिसताहेत.

सलामीच्या लढतीत मोठ्या फरकाने विजय नोंदवणारा यू मुम्बा (U Mumba) संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यू मुब्माने सलामीच्या सामन्यात धमाकेदार विजय नोंदवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्याच्या घडीला 6 गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरात जाएंट्स Gujarat Giants (6), पाटणा पायरेट्स Patna Pirates (6), यूपी योद्धा UP Yoddha (6), पिंक पँथर्स Jaipur Pink Panthers(6) प्रत्येकी संघाने समान गुण मिळवले असून गुण फरकाच्या आधारावर हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

Pro Kabaddi Points Table
AUS vs ENG : रुटचं अर्धशतक अन् पॅट कमिन्सची हवा; बाकी सगळे...

बंगळुरु बुल्स Bengaluru Bulls आणि पुणेरी पलटन (Puneri Paltan) यांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकून 5 गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. ते गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. तेलुगू टायटन्स Telugu Titansआणि तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) दोन्ही संघांतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दोन्ही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. तेलुगू टायटन्सने 4 गुणांची कमाई केलीये तर तमिळ थलायवाजने (Haryana Steelers) 3 गुण कमावले आहेत. हरियाणा स्टीलर्स दोन्ही सामन्यातील पराभवानंत 2 गुणांसह सर्वात तळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com