‘पीएसजी’ने पटकावले फ्रेंच विजेतेपद

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पॅरिस -  पॅरिस सेंट जर्मन अर्थात पीएसजीने अपेक्षेनुसार फ्रेंच लीग विजेतेपदाची पूर्तता केली, पण युरोपियन विजेतेपदाने या मोसमातही गुंगारा दिल्यामुळे सलग पाचव्या फ्रेंच विजेतेपदाची गोडी कमी झाली आहे.

पॅरिस -  पॅरिस सेंट जर्मन अर्थात पीएसजीने अपेक्षेनुसार फ्रेंच लीग विजेतेपदाची पूर्तता केली, पण युरोपियन विजेतेपदाने या मोसमातही गुंगारा दिल्यामुळे सलग पाचव्या फ्रेंच विजेतेपदाची गोडी कमी झाली आहे.

युरोपियन विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी पीएसजीने नेमारला २२ कोटी २० लाख युरो देऊन खरेदी केले होते, तरीही ते चॅंपियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच बाद झाले. फ्रेंच लीगमध्ये पीएसजीने बहुतेक लढती तीन गोलांच्या फरकाने जिंकल्या.  हीच हुकुमत त्यांच्या प्रगतीच्या आड येत असल्याचे मानले जात आहे. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोनॅकोला ७-१ असे हरवत जेतेपद निश्‍चित केले. पाच फेऱ्या शिल्लक असताना पीएसजी आणि मोनॅको यांच्यात १७ गुणांचा फरक आहे. 

फ्रान्समध्ये पीएसजीला आव्हानच नाही, याकडे स्पेनचा फुलबॅक युरी बेरुचिचे लक्ष वेधतो. फ्रेंच लीगचे माजी विजेते मोनॅकोही पीएसजीला माफक आव्हान देत नाहीत. संभाव्य उपविजेत्या मोनॅकोला पीएसजीने सलग चार लढतीत सहज हरवले आहे.

जमा तसेच तोटाही
फ्रेंच लीगमध्ये सलग ४० सामन्यांत अपराजित
मोसमातील सोळा लढतींत तीन किंवा त्यापेक्षा जास्त गोलच्या फरकाने विजय
नेमार नसतानाही कामगिरीत विशेष फरक नाही
मार्गदर्शक उनाही एमेरी यांचे खेळाडूंबरोबर मित्रत्वाचे संबंध
नेमारवर भर दिल्यामुळे अचूक संघ निवडण्यात अपयश

Web Title: PSG won the French title

टॅग्स