psl 6
psl 6Twitter

PSL 6 : पाकिस्तानी खेळाडूंचा भर मैदानात राडा (VIDEO)

सरफराज अहमद आणि डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांच्यातील वादवादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुबईच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत भर मैदानात पाकिस्तानी खेळाडूंमध्ये शाब्दिक वादावादी रंगल्याचे पाहायला मिळाले. लाहोर कलंदर्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात अबू धाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद आणि डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांच्यातील वादवादी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोघांच्यामध्ये भर मैदानात रंगलेला वाद मिटवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. क्वेटा संघाच्या डावातील 18 व्या षटकात दोन्ही खेळाडूंमध्ये बाचबाचीचे प्रकरण घडले. क्वेटा संघाचा कर्णधार सरफराज स्ट्राईकवर असताना लाहोरकडून शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या शेवटत शाहिन आफ्रिदीने मारलेला बाउन्सर सरफराजच्या हेल्मेटवर लागला. त्यानंतर दोघांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यातील वाद वाढताना दिसल्यानंतर लाहोरचा कर्णधार मोहम्मद हाफिज आणि मैदानातील पंचांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. नोबॉलच्या रुपात क्वेटा संघाला या चेंडूवर एक अवांतर धाव मिळाली.

psl 6
मिताली-झुलनचा खास विक्रम, द्रविड-गांगुलीला टाकले मागे
psl 6
PHOTOS: मेस्सी, छेत्री की रोनाल्डो? पाहा सर्वाधिक गोलस्कोरर

शाहिन आफ्रिदीने हा प्रकार खेळाचा एक भाग होता, असे म्हटले आहे. पण काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत. वरिष्ठ आणि माजी कर्णधारासमोर आक्रमक तेवर दाखवणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया काही क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. काहीजण शाहिन आफ्रिदीच्या समर्थनात बॅटिंग करतानाही दिसते.

या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना क्वेटाच्या संघाने वेदराल्ड (48), सरफराज (34) आणि आजम खान (33) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या. याचा पाठलाग करताना लाहोरचा संघ 18 षटकात 140 धावांपर्यंतच मजल मारु शकला. त्यांना 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com