कोहलीला जमले नाही ते पुजाराने केले

गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या. 

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र फलंदाजांनी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. पहिल्या 13 षटकांतच भारताने लोकेश राहुल, मुरली विजय आणि विराट कोहली हे तिन्ही फलंदाज गमावले होते. दुसऱ्या स्थानावर आलेल्या पुजाराने सुरवातीला सावध खेळ केला. पहिल्या तासाभरात त्याने सात धावा केल्या तर उपाहारापर्यंत  त्याने केवळ 4 धावा अधिक जोडल्या. त्याने 153 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. यात त्याने चार चौकार मारले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियात गाजतोय पुजारा नावाचा कोहली

Web Title: Pujara scores a century in 1st test against australia