नारायणनची ‘चाल’ वर्षात सर्वोत्तम, तर आनंदची दुसरी

नारायणनची ‘चाल’ वर्षात सर्वोत्तम, तर आनंदची दुसरी

पुणे - भारताचा ग्रॅंडमास्टर एस. एल. नारायणन याची ‘चाल’ बुद्धिबळविश्वात २०१७ मधील सर्वोत्कृष्ट ठरली. याचबरोबर माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याची ‘चाल’ दुसऱ्या क्रमांकाची ठरली.

‘चेसबेस’ या संकेतस्थळावर दरवर्षी सर्वोत्कृष्ट घटनांची नोंद घेतली जाते. सहा चालींना नामांकन मिळाले. त्यात एरोफ्लोट स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नारायणनने (२५२४) काळ्या मोहऱ्यांनिशी पोलंडचा २२ वर्षीय ग्रॅंडमास्टर डी. स्वीरक्‍झ  (२६४५) यास पराभूत केले. ग्युयोको पियानो (इटालियन गेम) पद्धतीत झालेल्या या डावात नारायणनने ३३व्या चालीस प्याद्याची ‘एफ-६’ ही अफलातून चाल केली. खोलवर अभ्यास असणारी आणि प्याद्याचे बलिदान देणारी ही चाल प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडविणारी ठरली. 

१. e४ e५ २. Nf३ Nc६ ३. Bc४ Bc५ ४. O-O Nf६ ५. d३ d६ ६. c३ a६ ७. a४ Ba७ ८. Re१ h६ ९. Nbd२ O-O १०. h३ Re८ ११. b४ Be६ १२. Bxe६ Rxe६ १३. Qc२ Ne७ १४. Nf१ Ng६ १५. Ng३ d५ १६. Rb१ Qd७ १७. c४ c६ १८. c५ Bb८ १९. Nf५ Bc७ २०. Be३ Ne७ २१. g४ Ng६ २२. Kh१ Rd८ २३. Rbd१ h५ २४. g५ Nh७ २५. Qb२ Ree८ २६. Kg२ Nhf८ २७. Ng१ Ne६ २८. Ne२ d४ २९. Bc१ Ngf४+ ३०. Nxf४ exf४ ३१. h४ g६ ३२. Nh६+ Kh७ ३३. e५ f६ ३४. exf६ f३+ ३५. Kg१ Nxg५ ३६. Qa२ Qh३ ३७. Qg८+ Rxg८ ३८. Re७+ Kh८ ०-१

आनंदने अमेरिकेचा ग्रॅंडमास्टर फॅबियानो करुआनाविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांसह केलेल्या चालीस ७४ मते पडली. सिन्क्‍यूफिल्ड करंडक स्पर्धेच्या पाचव्या फेरीतील हा डाव चाहते श्वास रोखून पहात होते. इंग्लिश ओपनिंग-फोर नाइट्‌स-फियानचेट्टो विविधतेच्या डावात आनंदची बाविसावी प्याद्याची चाल (२२.exf६)  प्रगल्भता, प्रतिभा, सखोल अभ्यास याची प्रचिती देणारी ठरली.  या बुद्धिबळातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या प्रभावशाली कल्पना असणाऱ्या सर्वोत्कृष्ट चालींचे इंग्रजी जगतात ‘ॲमेझिंग ब्रिलियन्स’ म्हणून वर्णन केले गेले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ६० मतांच्या जोरावर आनंद आघाडीवर होता. मात्र अंतिम टप्प्यातील मतदानानंतर नारायणनने बाजी मारली.

१. c४ e५ २. Nc३ Nf६ ३. Nf३ Nc६ ४. g३ d५ ५. cxd५ Nxd५ ६. Bg२ Bc५ ७. O-O O-O ८. d३ Bb६ ९. Bd२ Bg४ १०. Rc१ Nxc३ ११. Bxc३ Re८ १२. b४ Qd६ १३. Nd२ Qh६ १४. Nc४ Qh५ १५. Rc२ Rad८ १६. Nxb६ cxb६ १७. f३ Be६ १८. Qd२ b५ १९. f४ Bg४ २०. Bxc६ bxc६ २१. fxe५ f६ २२. exf६ Rxe२ २३. f७+ Kf८ २४. Bxg७+ Kxg७ २५. Qc३+ Re५ २६. Qd४ Qg५ २७. Rc५ Rxd४ २८. f८=Q+ Kg६ २९. Qf७+ १-०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com