काव्यपंक्तीची मती बहरत नेई धावगती!

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

वेगवेगळ्या भारतीय भाषांवर प्रभुत्व, कविता रचणे, शेरोशायरी, पुस्तक लेखन असे छंद जोपासणारी व्यक्ती धावतेसुद्धा आणि त्यातही ती सरकारी अधिकारीसुद्धा आहे, असे विलक्षण उदाहरण मोनिका सिंह यांनी निर्माण केले आहे.

पुणे : वेगवेगळ्या भारतीय भाषांवर प्रभुत्व, कविता रचणे, शेरोशायरी, पुस्तक लेखन असे छंद जोपासणारी व्यक्ती धावतेसुद्धा आणि त्यातही ती सरकारी अधिकारीसुद्धा आहे, असे विलक्षण उदाहरण मोनिका सिंह यांनी निर्माण केले आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील दहा किमी शर्यतीत भाग घेण्यासाठी पुण्याच्या या उपजिल्हाधिकारी सज्ज झाल्या आहेत. शाळेत नववीला असल्यापासून कविता करणाऱ्या मोनिका यांना धावायला लागल्यापासून काव्यपंक्ती आणखी लयबद्ध आणि बहारदार झाल्याचे वाटते. 

मॅरेथॉनच्या तयारीनिमित्त त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी त्यांच्या ट्विट पाहिल्या तेव्हा प्रोफाईलमधून वैविध्यपूर्ण पैलू उलगडले. त्यामुळे धावायला सुरवात कशी झाली, असे विचारले तेव्हा म्हणाल्या की, "मी कोल्हापूरमध्ये होते तेव्हा पोलिस ग्राउंडवर धावायचे. ते घरापासून जवळ होते. तेथे कधी शर्यतींत भाग घेतला नव्हता; पण धावणे जवळपास रोज व्हायचे.' 
शर्यतींत भाग घेण्यास कोणते निमित्त घडले, याविषयी मोनिका यांनी भाऊ मनोज ठाकूर आणि पती जयराम कुलकर्णी यांचा नामोल्लेख केला. त्या म्हणाल्या की, मनोज गेली सात-आठ वर्षे धावतो. त्याने दक्षिण आफ्रिकेतील कॉर्मेड्‌स शर्यतीतही भाग घेतला आहे. जयराम हेसुद्धा धावतात. दोन वर्षांपूर्वी "पीआरबीएम'मध्ये ते धावणार होते. मी येणार का, असे त्यांनी विचारले. इतक्‍या थंडीत कुडकुडत नुसते लोकांना धावायला पाहायला येण्यात रस नसल्याचे मी म्हणाले. त्यावर ते म्हणाले की, "नुसती ये, तिथली एनर्जी लेव्हल बघ. मग ठरव.' मी राजी झाले. बस तोच टर्निंग पॉइंट ठरला. कारण जो काही माहोल होता ते पाहून मी थक्क झाले.' 

मोनिका यांनी तेव्हापासून सात हाफ मॅरेथॉन धावल्या आहेत. दिल्ली, हैदराबाद येथील शर्यतींशिवाय त्या पुण्यात पाच वेळा शर्यतींत धावल्या आहेत. आपली सर्वोत्तम वेळ दोन तास 34 मिनिटे ही काही "ग्रेट' नाही, असे त्या नमूद करतात. इतके सारे छंद असताना धावण्यामुळे काव्यप्रतिभेवर काय "इफेक्‍ट' झाला, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या की, जीवनाचे रहाटगाडे ओढताना मनात विचारचक्र फिरत असते. पाय उचलून धावण्याची "कृती'टा वेग वाढत जातो तसे विचारचक्रातून "मुक्ती' मिळते आणि "उक्ती' सुचत जातात. तुम्ही घरी जाता तेव्हा घरचे, कार्यालयात जाता तेव्हा तिथले विचार सुरू असतात. धावणे ही एकच क्रिया अशी आहे की ज्यातून स्वनिर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळते. 
 

हार्दिक जोशीच्या तंदुरुस्तीचे रहस्य- 

मी माझ्या प्रोजेक्‍टनुसार वेगवेगळ्या प्रकारचं डाएट आणि वर्कआउट करतो. पण काही प्रोजेक्‍ट नसतानाही माझं वर्कआउट हे सुरूच असतं. कधी डाएट जास्त असतं, कधी कमी असतं. माझ्या वर्कआउटच्या वेळा जशा बदलतात त्याप्रमाणे माझं डाएटदेखील असतं.

कधी कधी मी रात्री जर वर्कआउट करत असेन तर मला सकाळ, संध्याकाळपर्यंत तेवढं खाणं गरजेचं आहे. जर मी सकाळी व्यायाम करतोय तर मला  संध्याकाळपर्यंत सगळा आहार संपवावा लागतो, जेणेकरून रात्रीत त्याचे चरबीत रूपांतर होऊ नये. पण आता जर माझा एखादा असा प्रोजेक्‍ट चालू असेल ज्याला माझं वजन कमी हवंय तेव्हा मग मला कर्बोदके कमी खाऊन चालत नाहीत. तेव्हा मी प्रथिने जास्त खातो. पण सामान्य माणसानेसुद्धा दिवसातला एखादा तास व्यायामासाठी दिला पाहिजे. तुम्ही जिममध्येच जा असे नाही. तुम्हाला जेवढं शक्‍य होतं तेवढं तरी तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी केलं पाहिजे. आपलं आरोग्य निरोगी होईल अशा दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण आज इतकं वातावरण खराब आहे की कोणता माणूस कोणत्या आजाराने आजारी पडेल काही सांगू शकत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला काय काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. 

- हार्दिक जोशी, अभिनेता

 

Web Title: Pune half marathon