आमच्या जोडीचे टायमिंग धावण्यातही जुळते!

अमोल-प्राची-गार्गी-आर्या उपळेकर सहकुटुंब ट्रेकिंगही करतात!
अमोल-प्राची-गार्गी-आर्या उपळेकर सहकुटुंब ट्रेकिंगही करतात!

मी ४१, तर प्राची ३८ वर्षांची आहे. आम्ही दोघे सिव्हिल इंजिनियर असून, स्वतःचा व्यवयास आहे. आम्ही मार्च २०१५ मध्ये धावण्यास सुरवात केली. सोसायटीने आयोजित केलेल्या पाच किमी शर्यतीने सुरवात झाली. शर्यत पूर्ण झाली, पण दोन दिवस अंगदुखीमुळे काहीही करता आले नाही. तरुणपणी मी अनेक खेळ खेळायचो, पण नंतर नोकरी-व्यवसायामुळे खेळ मागे पडला. तो अचानक सुरू केला तेव्हा शरीराने पहिला अलार्म वाजविला. तेव्हा माझी मलाच लाज वाटली; मग मी नियमित धावू लागलो. ध्येय ठेवून धावलात तर तुमच्या सवयी व पर्यायाने जीवनशैली बदलते. आम्ही तेच केले. प्राचीनेही मला साथ दिली. आम्हा दोघांची वेळ जवळपास सारखीच असते. गेल्या तीन वर्षांत आम्ही १० किमी शर्यतींत शंभरहून जास्त वेळा भाग घेत पूर्ण केल्या आहेत. मार्च २०१६ मध्ये हाफ मॅरेथॉनसाठी नाव नोंदविल्यानंतर सरावाच्यावेळी मला दुखापत झाली. प्राचीने भाग घेत शर्यत पूर्ण केली, मी तिला सायकलवर साथ दिली. नोव्हेंबर २०१७ मध्ये आम्ही दोघांनी मिळून हाफ-मॅरेथॉन पूर्ण केली. आम्ही दहाहून जास्त हाफ मॅरेथॉन धावलो आहोत. यंदा लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही १७ किमी धावलो.

नऊ डिसेंबरला आर्या (वय १५), गार्गी (वय ९) सहा किमी शर्यतीत धावतील, तर आम्ही हाफ मॅरेथॉनद्वारे मुंबईत प्रथमच फुल मॅरेथॉनमधील सहभागासाठी सराव करू.

३८ वर्षांचा असताना पाच किमी धावलो अन्‌ दोन दिवस डाउन झालो. तेव्हापासून निश्‍चय केला. आता वयाच्या ४२व्या वर्षी ४२ किलोमीटर १९५ मीटर अंतर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठीचा स्पर्धात्मक सराव नऊ डिसेंबरला पुण्यात करेन. प्राचीसुद्धा माझ्याबरोबर असेल.
- अमोल उपळेकर

ग्रुप बुकिंगला डिस्काउंट
 नऊ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये कुणीही सहभागी होऊ शकतो. ग्रुपने येणाऱ्यांना नोंदणी शुल्कात सवलत दिली जाईल.
 गृहनिर्माण संस्थांमधील सभासद पुढाकार घेऊ शकतात.
 शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा एकत्र येऊन धावू शकतात.
 डॉक्‍टर, वकील, शिक्षक, अशा विविध क्षेत्रांतील मंडळी.
 मैत्रिणी-मैत्रिणीही येऊ शकतात मिळून साऱ्या जणी!
 सायकलिंग, ट्रेकिंग असे वैविध्यपूर्ण छंद हौसेखातर किंवा निष्ठेनेही जपणारी मंडळी.
 संपर्क मोबाईल - 91725 98860

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com