अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे चांगलेच!

Pune-Half-marathon
Pune-Half-marathon

धावायला सुरवात केल्यानतंर अनेकांच्या मनात एका गोष्टीविषयी काळजी निर्माण झालेली असते. त्यांना प्रश्‍न पडलेला असतो की कठीण पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी धावण्यामुळे तोटा होतो का? याचे सोपे उत्तर असे आहे की, अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे केव्हाही चांगलेच! अर्थात मऊ पृष्ठभाग असलेले केव्हाही चांगलेच. त्यामुळे शरीरावर ताणही कमी पडतो, पण असा माती किंवा मऊ पृष्ठभाग असलेला जास्त अंतराचा मार्ग नेहमीच मिळेल असे नाही.

आपली हाडे ही काही यंत्रासारखी नसतात. यंत्र तीच-तीच क्रिया सारखी करीत राहिले तर उत्तरोत्तर ते वापर होऊन खराब होते आणि अखेरीस बंद पडते. हाडांचे मात्र तसे नसते. वर्कआउटमुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे क्षमतेबाहेर जाऊन आपण दीर्घ अंतर धावलो नाही तर हाडेच नव्हे, तर स्नायूबंधसुद्धा भक्कम होत जातात. जगभरातील प्रमुख मॅरेथॉन नॉर्मल रोडवर होतात. त्यामुळे धावण्याचा सरावसुद्धा तशाच पृष्ठभागावर करणे योग्य ठरते.

आज आपण पोटरीच्या स्ट्रेचिंगविषयी जाणून घेऊयात. धावल्यानंतर कळा येत असतील तर हा स्ट्रेच करावा. तो अगदी सोपा आहे. चित्रात दाखविल्याप्रमाणे एक पाय गुडघ्यात वाकवा आणि दोन्ही हात भिंतीला पुश करण्याच्या स्थितीत लावा. दुसऱ्या पायाच्या टाचेचा मागचा भाग जमिनीवर टेकवा. त्यामुळे पोटरीच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळेल. हा व्यायामप्रकार दुसऱ्या पायासाठी करा.

आज हे करा
 ५ ते १० मिनिटे वॉर्म-अप
 २० ते ४० मिनिटे झपझप चालणे-धावणे
 ५ ते १० मिनिटे स्ट्रेचिंग
(लेखक मॅरेथॉनपटू, संयोजक व मार्गदर्शक आहेत)

गट :  ६ कि.मी. फॅमिली रन, १० कि.मी., २१ कि.मी.

नावनोंदणीसाठी - संकेतस्थळ - www.bajajallianzphm.com                     संपर्क मोबाईल  91725 98860

शहरातील निवडक पाच ठिकाणी मोफत ट्रेनिंग सुरू आहे. 
संपर्क - समन्वयक - अनिल सावंत ८८७९४१६१७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com