नऊ डिसेंबरला धावण्याची ‘प्रेरणा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तयारी करीत आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागामुळे मुलांची खेळाची आवड वाढून ती मोबाईल, टीव्ही यांच्या अतिसंपर्कापासून दूर राहतील. खेळामुळे मानसिक ताण कमी होऊन शरीर सुदृढ व निरोगी राहते, मुलांचा आत्मविश्‍वास वाढतो. आमच्या शाळेत शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिले जाते. त्या तासाला मुले सांघिक तसेच वैयक्तिक खेळ खेळतात. कबड्डी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, धावणे, थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, कराटे, बुद्धिबळ, पोहणे या खेळांमध्ये आमची मुले जिल्हा तसेच विभागीय पातळीवरीलही स्पर्धांत भाग घेतात. काहींची निवड तर राज्य पातळीवर झालेली आहे.
- हेमलता नांगरे, प्राचार्य, कॅम्प एज्युकेशन सोसायटी अभिमान हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज

हा अतिशय उत्साहपूर्ण व आनंददायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तो उपयोगी पडेल. आमच्या शाळेत विविध मैदानी खेळ घेतले जातात तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नामवंतांची व्याख्याने ठेवली जातात.
- प्रा. शुभांगी इथापे, प्राचार्य, प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

धावण्यासारखा सोपा व्यायाम नाही आणि व्यायामासारखा मित्र नाही. त्यामुळेच या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने भाग घ्यावा. या उपक्रमाला आमच्या शाळेच्या शुभेच्छा!
- निशा पांडुरंग देशमुख, उपमुख्याध्यापिका, कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या हायस्कूल

Web Title: Pune Half marathon Running Student