सिंहगड रस्त्याने अनुभवली ऊर्जा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

धायरी : पहाटे साडेपाचची वेळ....पक्ष्यांची मंजुळ किलबिल...निसर्गरम्य हिरवळ...गुलाबी थंडी... या वातावरणात प्रत्येकात वेगळीच ऊर्जा वाहत होती. ऊर्जा होती ती आरोग्याची...वेगळ्या नांदीची. ऊर्जा होती ती पाणी बचतीची. या ऊर्जेचा अनुभव सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी घेतला. 

पुणे रनिंग साउथ संघटनेच्या वतीने 'लास्ट संडे ऑफ द मंथ' या मॅरेथॉनचे रविवारी आयोजन करण्यात आले. स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चार वर्षांच्या चिमुकलीपासून 75 वर्षांच्या आजोबा-आजींपर्यंत सगळ्यांनीच यात भाग घेतला. 

Image may contain: 1 person

Image may contain: 2 people, people smiling, people standing, shoes and shorts

Image may contain: 2 people, people smiling, people standing, shoes and outdoor

Image may contain: 16 people, people smiling, people sitting, tree, outdoor and nature

Image may contain: 3 people, people sitting

Image may contain: 1 person, smiling, standing, shoes, shorts and outdoor

Image may contain: one or more people and people standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing and shorts

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

Image may contain: 5 people, people standing and outdoor

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 1 person, standing and outdoor

Image may contain: one or more people, child and outdoor

Image may contain: one or more people, crowd and outdoor

पु. ल. देशपांडे उद्यानापासून मॅरेथॉन सुरू झाली. पहाटे साडेपाच वाजता पहिल्या टप्प्यात 21 किलोमीटर, सकाळी सहा वाजता दुसरा टप्पा दहा किलोमीटर, सकाळी साडेसहा वाजता तिसरा टप्पा पाच किलोमीटर, सात वाजता चौथा टप्पा तीन किलोमीटर असा होता. 21 आणि दहा किलोमीटरमध्ये अनेक पट्टीचे स्पर्धक उतरले होते. पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरसाठी लहान-थोरांनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर स्पर्धकांना अल्पोपाहार, सहभागी झाल्याबद्दल बॅच देण्यात आला. 

स्पर्धकांना 'सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) तेजस्वी सातपुते, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला. या वेळी नगरसेवक आनंद रिठे, नगरसेविका ज्योती गोसावी, दत्तवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, अनिल पाटील, 'सकाळ'चे वितरण व्यवस्थापक संतोष कुडले आदी उपस्थित होते. 

सातपुते, कडूकर यांचाही सहभाग 
मॅरेथॉनमध्ये नगरसेवक रिठे, तेजस्वी सातपुते, डॉ. वैशाली कडूकर, अनिल पाटील हेदेखील पाच किलोमीटर धावले. स्पर्धेत एकूण 1614 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन दरम्यान दत्तवाडी वाहतूक विभागाच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Pune Running organises Last Sunday of the month marathon