पुण्याच्या सागरचा सुवर्ण चौकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जालना - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६२व्या राज्य अंजिक्‍यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागर मारकडने  ५७ किलो वजनी गटात सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचवेळी पुण्याच्या अक्षय चोरघेला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे, वेताळ शेडके आणि कोल्हापूरच्या आशिष तावरे यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली.

येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नगरच्या मल्लांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून  घेत आपल्या कौशल्याचे सुरेख प्रदर्शन केले.  दुसऱ्या दिवशी माती विभागातील ५७ किलो वजनी गटात सागर मारकड मध्यवर्ती आकर्षण ठरला. त्याने उपांत्य पेरीत त्याने कोल्हापूरच्या ओंकार लाडला चीतपट करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत कस लागलेल्या कोल्हापूरच्या संतोष हिरगुडे याला अंतिम लढतीत सागरचे आव्हान पेलवले नाही. सागरने एकतर्फी वर्चस्व राखत १०-० असा विजय मिळविला. गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारला मुंबईच्या सतिन पाटीलकडून ५-६ अशी निसटती हार पत्करावी लागली. या वजनी गटात पुढे अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने साताऱ्याच्या प्रदीप सूळचा ४-१ असा गुणांवर पराभव करून सुवर्णपदक मिळविले. 

स्पर्धेतील ७९ किलो माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेडके याने उस्मानाबादच्या हणमंत पुरीला चीतपट करून सुवर्णपदक मिळविले. औरंगाबादचा अजहर शेख ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. गादी विभागात कोल्हापूरच्या  आशिष वावरे याने पुण्याच्या अक्षय चोरघेचे सुवर्ण स्वप्न मोडून काढले. निर्विवाद वर्चस्व राखून आशिषने अक्षयवर गुणांवर १०-२ असा विजय मिळविला. अमरावतीचा अब्दुल शोएब आणि 
नगरचा केवळ भिंगारे ब्राँझपदकाचे मानकरी ठरले.

Web Title: Pune Sagar Manakad won the gold medal for the fourth time in the 57kg category