पुण्यात होणार ‘सॉफ्टबॉल लीग स्पर्धा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - सॉफ्टबॉलमधील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आयस सॉफ्टबॉल ॲकॅडमी’तर्फे येत्या २३ ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यामध्ये सॉफ्टबॉल स्पर्धा भरविण्यात येणार आहे. अमित जोशी स्मरणार्थ या लीगचे हे नववे वर्ष असून, तीन दिवस चालणारी ही स्पर्धा एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. 

देशभरातील १२ संघ ( फ्रॅंचाइजी) या सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होणार असून, आंतराष्ट्रीय पाळीवरील खेळाडूंचाही यांमध्ये समावेश आहे. मुले व मुलींच्या गटामध्ये एकूण २४ सामने होणार असून, यामध्ये दिल्ली, बंगळूर, छत्तीसगड, जळगाव, मध्य प्रदेश, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे व मुंबईतील एकूण १८० खेळाडूंचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी सकाळ माध्यम समूह, मोहर, सार्थक हाउसिंग, रचना लाइफस्टाइल, अमानोरा ( सिटी ग्रुप), कुमार प्रॉपटीज, अमित इंटरप्राइजेस, साबळे संजीवनी, बट्टो ग्रीन बॅटरीज, फ्लीटगार्ड फिल्टर्स, चॅंपियन यूपीएस आणि संजय घुले व्हेंचर्स या टीमचा (फ्रॅंचाइजी) चा समावेश करण्यात आलेला आहे. 

यंदाच्या वर्षीचा इव्हेंट हा आयपीएलच्या धर्तीवर होणार असून, ज्यामुळे खेळाडूंना एक व्यावसायिक तत्त्वावर नवीन उंची गाठण्यास मदत होणार आहे. या लीगचे मीडिया पार्टनर ‘सकाळ माध्यम समूह’ आहे. सॉफ्टबॉल स्पर्धेविषयी तरुणांना अधिक माहिती मिळावी, जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळाकडे वळावे व नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेली नऊ वर्षे आयस सॉफ्टबॉलतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

Web Title: Pune will be 'softball league'