रशियाच्या कामगिरीवर पुतिन नाराज 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

रशियाचा समावेश "अ' गटात आहे. या गटात उरुग्वे संभाव्य विजेते आहेत. रशियाची दुसऱ्या क्रमांकासाठी सौदी अरेबिया आणि इजिप्तविरुद्ध लढत होईल. अस्तंगत सोविएत संघराज्यातून वेगळे झाल्यापासून रशियाने कधीही विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी गाठलेली नाही. घरच्या मैदानावर कामगिरी उंचावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे; मात्र संघास दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे संघाची घडीच बसलेली नाही. कदाचित, त्यामुळे विश्‍वकरंडकाचे यशस्वी संयोजन रशियासाठी महत्त्वाचे आहे, हे पुतिनही मान्य करीत आहेत. - पावेल कोलोबकोव, रशियाचे क्रीडामंत्री 
 
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वीच्या सामन्यात रशियाचा विजयाचा दुष्काळ आठ महिने कायम असल्यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही नाराज आहेत. त्यांनी संघाला कामगिरी उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची सूचनाच केली आहे. 

रशियाची विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत 1-1 बरोबरीत सुटली. त्यामुळे रशिया प्रथमच सलग सात सामन्यांत विजयापासून वंचित राहिले. या सामन्यानंतर चाहत्यांनी रशिया संघाची हुर्या उडवली होती. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वकरंडक स्पर्धा एका आठवड्यावर असतानाच पुतिन यांनी मुलाखतीत संघाची कानउघाडणी केली आहे. गेल्या काही सामन्यांत आपल्या संघाने चांगली कामगिरी केलेली नाही, हे आपल्याला दुर्दैवाने मान्य करायलाच हवे. पण, रशियातील सर्वच फुटबॉलप्रेमी चाहत्यांना संघाकडून अपेक्षा आहेत. देशाचा गौरव वाढवण्यासाठी संघाने प्रयत्न करावा. त्यांनी अत्याधुनिक, आकर्षक खेळ करतानाच शेवटपर्यंत लढावे, ही अपेक्षा आहे, असे पुतिन यांनी सांगितले. 

रशियाचा समावेश "अ' गटात आहे. या गटात उरुग्वे संभाव्य विजेते आहेत. रशियाची दुसऱ्या क्रमांकासाठी सौदी अरेबिया आणि इजिप्तविरुद्ध लढत होईल. अस्तंगत सोविएत संघराज्यातून वेगळे झाल्यापासून रशियाने कधीही विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी गाठलेली नाही. घरच्या मैदानावर कामगिरी उंचावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे; मात्र संघास दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे संघाची घडीच बसलेली नाही. कदाचित, त्यामुळे विश्‍वकरंडकाचे यशस्वी संयोजन रशियासाठी महत्त्वाचे आहे, हे पुतिनही मान्य करीत आहेत. - पावेल कोलोबकोव, रशियाचे क्रीडामंत्री 
 
Web Title: Putin upset on Russia's performance in football world cup match